Home मुंबई *सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ला अत्यंत निंदनीय; हल्लेखोरांना सोडणार नाही– उपमुख्यमंत्री एकनाथ...

*सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ला अत्यंत निंदनीय; हल्लेखोरांना सोडणार नाही– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

25
0

*सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ला अत्यंत निंदनीय; हल्लेखोरांना सोडणार नाही– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

*खासदार हरसिमरत कौर बादल आणि नांदेडच्या एसपींशी फोनवरून साधला संवाद*

मुंबई:
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक असून, या प्रकरणातील सर्व आरोपींवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी तथा पंजाबच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि सुखबीर सिंग बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ते लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.

तसेच, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांशी (SP) थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी पोलीस प्रशासनाला या प्रकरणाची सखोल आणि सविस्तर तपास करण्याचे व सुरक्षेत कोणतीही चूक झाली असल्यास त्याची चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

धार्मिक वा सामाजिक ठिकाणी होणाऱ्या अशा हल्ल्यांना महाराष्ट्रात किंवा देशात कोणतीही जागा नाही, असे सांगत शिंदे यांनी या हिंसक घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. या प्रकरणातील हल्लेखोरांना सोडले जाणार नाही; तपासाअंती या गुन्ह्यातील प्रत्येक दोषीला शोधून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल आणि कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच “धार्मिक स्थळांची पवित्रता, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे,” असे प्रतिपादनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here