Home मुंबई स्वराज्य भूमिही नटली स्वातंत्र्य दिनासाठी ; ओम राऊत यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

स्वराज्य भूमिही नटली स्वातंत्र्य दिनासाठी ; ओम राऊत यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

23
0

*स्वराज्य भूमिही नटली स्वातंत्र्य दिनासाठी ; ओम राऊत यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या गिरगांव चौपाटीवर असलेल्या स्वराज्यभूमीवर ७९ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ‘लोकमान्य’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. ‘लोकमान्य’ चित्रपटाच्या निर्मितीपूर्वी ज्येष्ठ पत्रकार, शिवसेनेचे माजी खासदार भारतकुमार राऊत, ओम राऊत व अभिनेते सुबोध भावे लोकमान्यांच्या समाधी स्थानी अभिवादनासाठी आले होते. ध्वजारोहणापूर्वी लोकमान्यांची पगडी देऊन स्वराज्यभूमी स्मारक समिती तर्फे चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचेआयोजन लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समिती तर्फे होत आहे. स्वराज्यभूमीचे व्यवस्थापन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येत असल्याची माहिती लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष प्रकाश सिलम यांनी दिली.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here