*मराठी नाट्यव्यावसायिक निर्माता संघ, मुंबई च्या नवीन कार्यकारिणीची निवड*
मुंबई,
मराठी रंगभूमीच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या *मराठी नाट्यव्यावसायिक निर्माता संघ, मुंबई* च्या ऑगस्ट २०२६ ते जुलै २०३१ या ५ वर्षांच्या कालावधीसाठी नवीन पदाधिकारी आणि कार्यकारिणीची निवड आज दि. १० ऑगस्ट २०२६, सोमवार रोजी *श्री. शिवाजी मंदिर, दादर बोर्ड रूम(दादर पश्चिम), मुंबई.* येथे दुपारी ०४:०० वाजता झालेल्या सभेत एकमताने करण्यात आली.
या सभेत खालील पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली:
*नवीन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य* *अध्यक्ष* : राहुल भंडारे *उपाध्यक्ष* : ज्ञानेश महाराव *प्रमुख कार्यवाह* : श्रीकांत तटकरे *कोषाध्यक्ष* : संदीप विचारे,सह कार्यवाह :अजय विचारे *सह कोषाध्यक्ष* प्रिया पाटील
*सदस्य* : अशोक नारकर, प्रदीप कबरे, दिपक नलावडे संतोष पवार,शेखर दाते
*सल्लागार मंडळ – एकमताने निवड*
उदय धुरत ,नवनाथ (प्रसाद) मच्छिंद्र कांबळी ,संतोष भरत काणेकर
नवनियुक्त कार्यकारिणी आणि सल्लागार मंडळाच्या सर्व सदस्यांचे संघाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. पुढील ५ वर्षात मराठी नाट्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी आणि नाट्यव्यावसायिकांच्या हितासाठी संघ सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
*स्वाक्षरी*
श्रीकांत तटकरे.
प्रमुख कार्यवाह.
मराठी नाट्यव्यावसायिक निर्माता संघ, मुंबई
























