Home मुंबई *ताथवडे येथील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार माणुसकीला काळीमा फासणारा*

*ताथवडे येथील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार माणुसकीला काळीमा फासणारा*

7
0

*ताथवडे येथील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार माणुसकीला काळीमा फासणारा*
*जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा करा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

पीडित परिवाराला सामाजिक न्याय मंत्रालयाकडून १०लाखांची मदत

मुंबई दि.४ –
पिंपरी चिंचवडमधील वाकड पोलिस स्टेशन अंतर्गत ताथवडे गावात मोलमजुरी करणाऱ्या दाम्पत्याच्या दोन चिमुकल्या मुलींवरील अत्याचार माणुसकीला काळीमा फासणारा आहे.या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे.त्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविला पाहिजे. आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत. पुन्हा असे प्रकार समाजात घडू नयेत यासाठी आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा केली पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज केली. पिपंरी चिंचवड येथील ताथवडे येथे पीडित परिवाराची केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली.
ताथवडे येथील ६ आणि १० वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा रिपब्लिकन पक्षा तर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे.त्या परिवाराला रिपब्लिकन पक्षा तर्फे तातडीने ५१हजारांची मदत ना. रामदास आठवले यांनी केली. या पिढीत दोन्ही मुलींना सामाजिक न्याय विभागा तर्फे प्रत्येकी ५ लाख अशी मिळून १० लाखांची मदत पीडित कुटुंबाला मंजूर करण्यात आली आहे.या प्रकरणी पोलिस अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुऱ्हाडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक साळुंखे यांनी चांगला तपास करून चार्जशीट लवकर दाखल करतील.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नगरसेवक कुणाल व्हावलकर ; नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे; बाळासाहेब भागवत; रिपाइं महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे; आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here