Home मुंबई *उमा तेंडोलकर यांच्या निरुपणाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; लोकमान्य टिळक पुण्यतिथी सुविद्यालयात साजरी*.

*उमा तेंडोलकर यांच्या निरुपणाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; लोकमान्य टिळक पुण्यतिथी सुविद्यालयात साजरी*.

21
0

*मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सुविद्या प्रसारक संघाचे सुविद्यालय, बोरीवली पश्चिम येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्या ह. भ. प. श्रीमती उमा गजानन तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जीवन प्रवास, त्यांचे कार्य, त्यांचा दृढनिश्चय आणि स्वातंत्र्यलढा आपल्या मधुर वाणीत समजावून सांगितला. टिळकांच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी रंगवून सांगताना त्यांनी आपल्या निरूपणाला संस्कृत श्लोक तसेच संतांच्या अभंगांची छान जोड दिली. या कार्यक्रमात सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष श्री महादेव गोविंद रानडे हे अध्यक्षस्थानी होते. तसेच विशेष निमंत्रित म्हणून इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा श्रीमती सरिता गुजराथी व सुविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी कुमारी प्रतिमा राजवाडे सुविद्या प्रसारक संघाच्या कार्याध्यक्षा श्रीमती देवयानी सबनीस, सुविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जयंतीलाल निकम आदी मान्यवर उपस्थित होते. लोकमान्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सतीश पारकर, कार्यवाह श्री. संजय दळवी आणि सदस्य श्री. राजेंद्र मोहिते यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. लोकमान्य प्रतिष्ठान तर्फे श्री.सतीश पारकर व श्री. संजय दळवी यांनी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष श्री. महादेव गोविंद रानडे यांना प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्त केल्याचे पत्र सुपूर्द करून त्यांना सन्मानित केले.*

*लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून सुविद्यालयाचा प्रथम पारितोषिक वितरण समारंभही संपन्न झाला. शालांत परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच शालेय अभ्यासक्रमामध्ये उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन कौतुक करण्यात आले. शाळेच्या नादब्रह्म समूहाने संगीत शिक्षिका श्रीमती निशा शिंदे टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम गीते सादर केली. कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने झाला.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here