Home मुंबई *स्वराज्यभूमि गहिवरली ! टिळक पुण्यतिथी दिनी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

*स्वराज्यभूमि गहिवरली ! टिळक पुण्यतिथी दिनी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

11
0

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : १ ऑगस्ट हा लोकमान्य दिवस ! या दिवशी १९२० साली देशातले आबाल वृद्ध रडत होते. आकाशालाही दुःख आवरत नव्हते, तेही धायमोकलुन रडत होते. पावसाची तमा न बाळगता लक्षावधी लोक पालखी मागे चालत होते. चौपाटीवर तर महासागर की घनसागर मोठा हेच कळत नव्हते. आजाराच्या अंतिम क्षणी सुद्धा लोकमान्य स्वराज्याबद्दलच बोलत होते. जनतेचे एवढे अलोट प्रेम न भुतो न भविष्यति होते. या लोकांमध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते २००९ मधे लोकमान्य टिळक शासनाच्या विस्मृतीत गेले होते. पण हजारो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमुळे व सर्व जाती धर्मातील लोकांमुळे लोकमान्य टिळक विस्मृतीत जाऊ शकले नाहीत.

१ ऑगस्ट रोजी १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त लोकांचा उत्स्फूर्त वाढता सहभाग लक्षणीय होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीनती आश्विनी भिडे यांनी समाधी स्थानी पुष्पचक्र वाहुन ध्वजारोहण केले. तत्पूर्वी त्यांना लोकमान्यांची पगडी व टिळकांचे चित्र चरित्र देऊन अनुक्रमे स्थानिक नगरसेविका श्रीमती स्नेहल तेंडुलकर व टिळकांचे पणतु श्री शैलेश टिळक यांनी सन्मानित केले. श्री. सचिन अहिर यांनी विधान परिषदेचे उपसभापती असूनही पदाचा कोणताही बडेजाव न मिरवता लोकमान्य टिळकांच्या दर्शनाला विनम्रपणे उपस्थित राहुन आदर्श पायंडा पाडला. या कार्यक्रमाला सामान्यांपासुन सर्व स्तरातील मान्यवरांची आवर्जून उपस्थिती होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त व स्मारक समितीचे सल्लागार यांनी विद्यमान आयुक्तांचे स्वागत केले.
चहापानाचे आमंत्रण :
विधान परिषदेचे उपसभापती श्री सचिन अहिर यांनी स्वराज्यभूमी स्मारक समितीच्या कार्यकारिणीला विधान भवनात चहापानाचे आमंत्रण दिले. स्वराज्यभूमीची कामे मार्गी लावण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here