Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा बालरंगभूमी परिषद या संस्थेतर्फे २ ऑगस्ट हा दिवस मराठी बालनाट्य दिवस

बालरंगभूमी परिषद या संस्थेतर्फे २ ऑगस्ट हा दिवस मराठी बालनाट्य दिवस

16
0

*शालेय विद्यार्थ्यां करिता इतिहास महाराष्ट्राचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावर आधारित एकपात्री, स्वगत, नाट्यछटा संगीत गायन सादरीकरण महोत्सव*

मराठी बालनाट्य दिवस निमित्त आयोजित सर्धेत सहभाग घेणे बाबत.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची संलग्न संस्था बालरंगभूमी परिषद या संस्थेतर्फे २ ऑगस्ट हा दिवस मराठी बालनाट्य दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. २ ऑगस्ट १९५९ रोजी स्व. रत्नाकर मतकरी लिखित स्व. सुधाताई करमरकर दिग्दर्शित मधुमंजिरी या मराठी बालनाट्याचा प्रयोग व्यावसायिक स्तरावर झाल्याची नोंद असल्याकारणाने बालरंगभूमी परिषदेतर्फे २ ऑगस्ट हा दिवस मराठी बालनाट्य दिवस म्हणून साजरा करण्यात येते. यानिमित्ताने मराठी भाषेचा प्रसार व प्रचार या उद्देश सहित बालरंगभूमी परिषदतर्फे शालेय विद्यार्थ्यां करिता इतिहास महाराष्ट्राचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावर आधारित एकपात्री, स्वगत, नाट्यछटा संगीत गायन सादरीकरण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात स्पर्धा ही प्राथमिक फेरी व अंतिम फेरी यानुसार शालेय स्तरावर तीन गटात होणार असून सदर स्पर्धेकरिता कोणतेही शुल्क विद्यार्थ्याकडून घेण्यात येणार नाही. प्राथमिक फेरी ही २ ऑगस्ट २०१६ रोजी रविवार, यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल, माटुंगा (पश्चिम) या ठिकाणी होणार आहे.
घ्यावेत
सदर स्पर्धा महोत्सवात आपल्या शाळेतील जास्तीत जास्त स्पर्धक विद्यार्थी सहभागी करून
ही नम्र विनंती.
स्पर्धा महत्त्वाची नियमावली आणि प्रवेश अर्ज सोबत देत आहोत.
दिनांक ३० जुलै २०२६ पर्यंत स्पर्धेची प्रवेशिका स्वीकारली जाईल. प्रवेशिका प्राप्त शाळांना स्पर्धकांना ३१ जुलै २०२६ रोजी स्पर्धेची वेळ कळविण्यात येईल.
कृपया, याची नोंद घ्यावी ही विनंती.
सुनिल सागवेकर
उपाध्यक्ष,
बालरंगभूमी परिषद, बृहन्मुंबई शाख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here