केमिकल लोचा नक्की कोणाचा?
सत्ताकारणाचा लोचा बुमरॅग युवा लढा?
१.सुरुवात कोणापासून झाली?
नीट परिक्षा घोटाळा का कसा झाला? इतरही घोटाळे आहेतच त्या विरोधात मुलं एकवटली. जे गरजेचं होतं. राजकारणाच्या पलीकडे जाऊन व्यक्त होणं तर अधिक आवश्यक होतं. आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज हा काय फुलांचा पाऊस होता? प्रशासन प्रशासक आणि लोकप्रतिनिधी ची पहिली जबाबदारी आहे नी होती की या मुलांचं ऐकून विषयातून चांगला मार्ग काढणे. पण तरीही राजकारण सत्ताकारण होत राहिले.
नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी भोसला मिलिटरी स्कूलमध्ये बोलतांना एक वाक्य टाकले. हो टाकलेच…
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय.जेन-झीला काही सांगणंही मुश्किल झालंय.
कारण काय सांगितलं तर -२४तास मोबाईल, सततचं स्क्रोलिंग.विचार करण्याची क्षमता कमी झाली.
पण त्यांच्या भाषणात नीट आंदोलन आणि पोलिसांवरील टीकांचाही उल्लेख होता.
म्हणजे एकाच वेळी तरुणाईला डोस आणि सिस्टीमचा बचाव पण ते करताना दिसले. हे केमिकल लोचा म्हणण्याची ही वेळ नव्हती. निवृत्त पोलीस अधिकारी शिरीष इनामदार काय म्हणाले ते त्यांनी नक्कीच वाचलं ऐकलं असेल. त्यावर का नाही बोलले हे लेखक परफेक्शनिस्ट?
●२.मागील काहीवर्षात काय झालं तरुणाईचं ?●
१९९४ ला दम मारो दम- मधून नशा शरीराची होती. यात गाणं, सिनेमा,मर्यादित माहिती होती. आता लाईकची,रीलची,व्हायरल होण्याची वेळ आली.मोबाईलआला.इंटरनेटआलं.24×7माहितीचा माराआला. अनेक व्यसनं आली.
नीट,जेईई,एमपीएससीचा ताण आहेच. पेपरफुटी.बेरोजगारी.महागाई हे विषय तर त्रस्त करत आहेतच.
सोशल मीडियावर सगळ्यांचं जीवन परफेक्ट दिसतं.त्यामुळे ‘तुलनेचा ताण’ वाढतो का?
यालाच डॉक्टर ‘डिजिटल थकवा’ किंवा ‘केमिकल लोचा’ म्हणतात.
मेंदूला ब्रेक नसल्यामुळे चिडचिड, राग, डिप्रेशन वाढतं हे बरोबर आहे. पण सगळीच पिढी तशी आहे असं म्हणता येत नाही.
सर्व व्यवस्था यावर नियंत्रण आणण्यात अपयशी आहे .कारण सत्तासंघर्ष महत्वाचा आहे. आणि म्हणूनच २७दिवस आंदोलन चालले.
●३.खरा केमिकल लोचा कुठे आहे?●
सत्तेसाठी काहीही करताना सत्ताकारणी विश्वासार्हता गमावून बसलेत. याचं भान नाही त्यांना.साम,दाम,दंड,ईडी,सीडी,सोशल मीडिया, पेडट्रोलर्स कोणी आणले? तर ह्याचा उपयोग २०१४ पासून मोठ्या प्रमाणावर सुरु झाला. मुख्य मीडिया तसाही वाहून गेलाय.
सोशल मीडियाला शस्त्र बनवलंय.नरेटिव्ह सेट केले.ट्रोल केले.बॉट चालवले.
तरुणाई हे सगळं पहात होती. निरिक्षण करत होती. काय चाललय हे समजुन घेत होती. राजकारणापासून दूर असणारी ही नवी पिढी तेच पहात शिकत आलीय. रील,मीम,फेकन्यूजचा वापर केला जात होता हेही पहात होती.
●४.बुमरॅग कसा होतोय?●
आता हा तेच सोशल मीडिया हाती घेऊन नवी पिढी प्रश्न विचारतेय. अनेकांचं भविष्य अंधारात गेलंय . नीटच्या पेपरफुटीवर बोलली. बेरोजगारीवर बोलली.सत्तेवर बोलली.
जंतरमंतर आणि देशभरात आंदोलने केली.पोस्टर,मीम,घोषणांनी सिस्टीमला जाब विचारला.
●पण उत्तर काय मिळालं?●
भाजप खासदार कंगना रणौत म्हणाल्या-
“GenZचेआंदोलन किळस आणणारे आहे.मीएकाच ठिकाणी इतकी कुरूपता कधी पाहिलीनाही.”
“यांना कोण जन्म देतंय आणि वाढवतंय?”
“स्वतःला झुरळे म्हणवता आणि तसेच वागता.”
“मी त्यांना गटार पिढी म्हणते.ते कुरूप आणि भ्रष्ट आहेत.गृहिणी होऊ शकत नाहीत.”
“ते दारू आणि अमली पदार्थाचे स्वातंत्र्य मिरवतात.”
●राजकीयप्रतिक्रिया●
काँग्रेस भाई जगताप-आंदोलनात मुली-मुलांना झालेल्या मारहाणीचा पश्चाताप नाही का?
AIM वारिस पठाण-निंदनीय.NEETचा फुल फॉर्म माहीत आहे का?संपूर्णGenZचीमाफी मागा.
●शेवटचा सवाल●
प्रश्न विचारला की व्यक्तीवर हल्ला होतो
हाच तर सत्ताकारणाचा बुमरॅग आहे.
जे पेरलं तेच उगवतंय. किंवा त्याहून जास्त प्रतिसाद येतोय. कारण कुठल्याही गोष्टीची मर्यादा असते .
●लोचा खरं कुठेआहे?●
मोबाईल स्क्रोल करणाऱ्या तरुणाच्या हातात ?
की प्रश्नाचे उत्तर न देता शिव्या देणाऱ्या सिस्टमच्या?
तुम्हाला काय वाटतं?कमेंट मध्ये सांगा.
#ChemicalLocha#Bumerang#GenZ#VishwasNangarePatil#KanganaRanaut#Sattakaran#NEET#Berojgari#NDTV

















