Home मुंबई *‘त्या’ ८१ इमारतींच्या समूह पुनर्विकास* *प्रस्तावावर शासनाने तातडीने कार्यवाही करावी* *आ....

*‘त्या’ ८१ इमारतींच्या समूह पुनर्विकास* *प्रस्तावावर शासनाने तातडीने कार्यवाही करावी* *आ. प्रवीण दरेकरांची औचित्याच्या मुद्याद्वारे मागणी*

47
0

मुंबई – दक्षिण मुंबईतील उमरखाडी येथील ८१ इमारतींच्या समूह पुनर्विकास प्रस्तावावर शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आज सभागृहात औचित्याच्या मुद्यावर बोलताना केली.

आ. दरेकर म्हणाले कि, दक्षिण मुंबईतील आनंदराव सुर्वे मार्ग, उमरखाडी येथील ६.२३ एकरावर उपकरप्राप्त इमारतीसह पीएमजीपी व काही इमारती मिळून ८१ इमारतींचा समूह पुनर्विकास योजने अंतर्गत पुनर्विकास करण्यासाठी उमरखाडी पुनर्विकास समितीने म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनरचना विभागाला २०२३ रोजी आराखड्यासह प्रस्ताव सादर करूनही अद्याप यावर शासन व म्हाडाकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. या ८१ इमारतींमध्ये २३०० मराठी कुटुंबे व दुकानदार कुटुंबे वास्तव्यास आहेत. इमारतींचा समूह पुनर्विकासाचा सर्वाधिक मोठा प्रस्ताव असून शासनाने तातडीने कार्यवाही करावी, असे सांगत आ. दरेकरांनी शासनाचे लक्ष वेधले.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here