*पिंपरी चिंचवड महानगरपालिका मोशी कचरा डेपो येथे सुरु असलेल्या बांधकामावर डोंगर कोसळल्याने झालेली दुर्घटना UPDATE* :
स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, लष्कर आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल आहेत.
या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव विनिता वेद सिंगल, पिंपरी चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त विजयकुमार सूर्यवंशी, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना संपर्क साधला आणि मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दुर्घटनेत अडकलेल्या लोकांना बाहेर काढावे तसेच जखमी झालेल्या व्यक्तींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे.NDRF ची टीमही घटनास्थळी दाखल आहे.

















