Home मुंबई *PESA मोबिलायझर्सच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी १० जुलैनंतर बैठक : मंत्री जयकुमार...

*PESA मोबिलायझर्सच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी १० जुलैनंतर बैठक : मंत्री जयकुमार गोरे**

37
0

मुंबई, दि. १ जुलै २०२६: PESA मोबिलायझर्स यांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, संबंधित विषयाचा सविस्तर अभ्यास करून तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर १० जुलै नंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या समन्वयाने PESA मोबिलायझर्सच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्यात येईल.

PESA मोबिलायझर्सच्या विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना मंत्री श्री. गोरे यांनी शासन त्यांच्या मागण्यांबाबत संवेदनशील असल्याचे सांगितले. संबंधित विषयातील सर्व बाबींचा अभ्यास करून तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आदिवासी विकास विभाग आणि ग्रामविकास विभाग यांच्या समन्वयातून १० जुलैनंतर बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीत सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा करून सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

000 00

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here