Home मुंबई लोकशाहीत प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही, विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देणे ही सरकारची...

लोकशाहीत प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही, विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देणे ही सरकारची जबाबदारी आहे!

31
0

विधान परिषदेतील काँग्रेसचे विधिमंडळ नेते सतेज पाटील यांनी लिहिले सभापती राम शिंदे यांना पत्र
MPSC बाबत विचारलेल्या प्रश्नांना सरकारने उत्तर देण्याची केली मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोग संदर्भातील सभागृहात उपस्थित केलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर संबंधित मंत्र्यांकडून सविस्तर, वस्तुनिष्ठ आणि समाधानकारक उत्तरे मिळावीत, यासाठी विधान परिषद सदस्य सतेज (बंटी) पाटील यांनी सभापतींकडे अधिकृत पत्राद्वारे मागणी केली आहे

आज लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. परीक्षा, भरती प्रक्रिया, पेपरफुटी, रिक्त पदे आणि विलंब यामुळे त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अशा वेळी सभागृहात मांडलेल्या गंभीर मुद्द्यांवर केवळ औपचारिक नव्हे, तर स्पष्ट आणि जबाबदार उत्तर देणे सरकारचे कर्तव्य आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रत्येक प्रश्नाला न्याय मिळालाच पाहिजे. लोकशाहीतील उत्तरदायित्व टिकवण्यासाठी सरकारने या मागणीची तातडीने दखल घेऊन प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी पत्रात केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here