Home Trending Now डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या शुभेच्छा…

डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या शुभेच्छा…

165
0

*राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या शुभेच्छा…*

मुंबई दि.३० : महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेची मुख्य सचिव म्हणुन सुजाता सौनिक यांची निवड आज झाली आहे. श्रीम.सौनिक यांनी आतापर्यंत राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. १९८७ च्या आयएएस बॅचच्या अधिकारी आहेत. श्रीम.सौनिक यांची निवड झाल्याबद्दल विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले. त्याचबरोबर डॉ.गोऱ्हे यांनी महिलांना प्रशासनाच्या सेवेत मुख्य पदावर महिलाचे निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे देखील आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here