*📰 ‘माईमीडिया24’ -अग्रलेख*
*”९ ‘अडिचकी’ महापौर: खुर्ची सगळ्यांना, ‘इतिहास’ फक्त ३ जणांनी घडवला”*
*✍️ शीतल करदेकर / माईमीडिया24*
*शनिवार, ६ जून २०२६|
🔴 *’माईमीडिया24′ विशेष रिपोर्ट* 🔴
*’अडिचकी’ मिळाली ९ जणांना. पण ‘मुंबई’ च्या ‘काळजाला’ हात फक्त ३जणांनी लावला.*
*’खुर्ची’ सगळ्यांनी भोगली. ‘ठसा’ फक्त २-३जणांनी उमटवला.*
*’माईमीडिया24′ ने ९ ‘अडिचकी’ महापौरांचे ‘अंमलबजावणी रिपोर्ट कार्ड’ तपासले. ‘निकाल’ तुमच्यासमोर.आहे*
-📊 ९महापौरांचा ‘अंतिम स्कोअर’ – कोण पास, कोण नापास?*
**महापौर** **कार्यकाळ** **’प्रभावी’ का? ‘हिताचे निर्णय’ कोणते?** **’प्रभागाला’ काय दिले?** **’माईमीडिया24′ गुण**
**१ हरेश्वर पाटील** १९९९-२००२ **’अडिचकी’ पॅटर्न अमलात आणला.** प्रशासकीय स्थिरता दिली. ‘पहिला माणूस’ म्हणून रस्ता खुला केला. **दहिसर-बोरीवली:** टोल नाका-हायवे जोडरस्ता, नदी पुनरुज्जीवन चर्चा, महापौर निधी प्रभागात. **१०/१० 🏆**
**२. सुनील प्रभू** २०१२-२०१४ **फिल्डवर दिसणारा महापौर.** नालेसफाईसाठी रस्त्यावर उतरले. डिजिटल क्लासरूम, अनधिकृत बांधकाम कारवाई. **जोगेश्वरी:** JVLR ला चालना, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड पाठपुरावा, स्थानक सुशोभीकरण. **८/१० 🥈**
**३. किशोरी पेडणेकर** २०१९-२०२२ **’कोविड’ काळातील चेहरा.** जम्बो सेंटर, ऑक्सिजन, वॉर रूम समन्वय. संकटात निर्णय + अंमलबजावणी. **वरळी:** स्पेशल प्रभाग-काम नाही, पण संपूर्ण मुंबईसाठी रस्त्यावर. **७/१०🥉**
**४. डॉ. शुभा राऊळ** २००७-२००९ पहिल्या महिला महापौर. आरोग्य मुद्दा उचलला. **दादर:** उल्लेखनीय वेगळे काम नाही. **५/१०**
**५. महादेव देवळे** २००२-२००५ रुटीन कामकाज. **भायखळा:** विशेष काही नाही. **४/१०**
**६.दत्ता दळवी** २००५-२००७ रुटीन कामकाज. **परळ:** विकास झाला, पण ‘महापौर’ म्हणून वेगळा ठसा नाही. **४/१०**
**७. श्रद्धा जाधव** २००९-२०१२ कार्यकाळ शांततेत पूर्ण. **परळ:** प्रभाग-केंद्रित गेमचेंजर काम नाही. **३/१०**
**८. स्नेहल आंबेकर** २०१४-२०१७ दलित समाजातील पहिल्या महिला महापौर. **कुलाबा:** वाद जास्त, काम कमी अशी टीका. **३/१०**
**९. विश्वनाथ महाडेश्वर** 2017-2019 कार्यकाळ पूर्ण केला. **वांद्रे पूर्व:** बांद्रा आधीच VIP. महापौरपदाचा लाभ नाही. **३/१०**
—
*🎯 ‘माईमीडिया24’ चा अंतिम निर्णय – ५ मुद्दे*
*१. ‘द बेस्ट’ = हरेश्वर पाटील:*
*कारण:: ‘अडिचकी’ सुरू केली. ‘दहिसर-बोरीवली’ चा कायापालट केला. ‘प्रभाग फर्स्ट’ नीती पाळली. ‘ग्राउंड कनेक्ट’ ठेवला.
*२ ‘फिल्डवरचा हिरो’ = सुनील प्रभू:*
*कारण: ‘फाईल’ नाही, ‘फिल्ड’ वर दिसले. ‘JVLR’ सारखा गेमचेंजर प्रोजेक्ट पुढे नेला. ‘जोगेश्वरी’ चे नाव मोठे केले.
*३. ‘संकटातील सावली’ = किशोरी पेडणेकर:*
*कारण:* ‘कोविड’ मध्ये मुंबई ठप्प होती तेव्हा ‘निर्णय’ घेतले आणि ‘अंमलात’ आणले. लोकांच्या ‘लक्षात’ राहिल्या.
*४. ‘कडवं सत्य’:*
*९ पैकी एकाही महापौराने ‘पाणी, खड्डे, ट्रॅफिक, कचरा’ हे मुंबईचे ४’मूळ आजार’ बरे केले नाहीत.*
*म्हणून ‘रयत’ म्हणते: “खुर्ची अडीच वर्षाची मिळाली, पण मुंबई तिथेच आहे.”*
*५. ‘रितू तावडे’ यांच्यासाठी ‘गोल्डन चान्स’:*
*त्या १०व्या आहेत. ‘सर्वात प्रभावी अडीचकी’ बनायची संधी आहे.*
*’फॉर्म्युला’ सोपा: १ ‘मूळ प्रश्न’ सोडवा + ‘आपल्या प्रभागा’ला न्याय द्या = ‘इतिहास’ घडेल.*
—
*🚨 ‘माई मीडिया 24′ चा इशारा:*
*’अडिचकी’ म्हणजे ‘सूट’ नाही. ‘अडिच वर्ष’ = ९१२ दिवस. ‘रोज १’ निर्णय = ९१२ ‘बदल’.*
*’महापौर’ बदलला, ‘प्रॉब्लेम’ नाही बदलला – हे आता चालणार नाही.*
*’हरेश्वर पाटील मॉडेल’ – ‘प्रभाग फर्स्ट + निर्णय + अंमलबजावणी’ हाच ‘उत्तम’
—‘माईमीडिया24’ चा ‘हल्लाबोल’ सुरू..















