Home Trending Now *’मूर्ती उभी राहिली… नीती बुडाली?’* *’स्टॅच्यु ऑफ युनिटी’ होते, ‘शिवस्मारक’ का नाही?...

*’मूर्ती उभी राहिली… नीती बुडाली?’* *’स्टॅच्यु ऑफ युनिटी’ होते, ‘शिवस्मारक’ का नाही? – शिवनीतीचा सवाल*

30
0

*’मूर्ती उभी राहिली… नीती बुडाली?’*
*’स्टॅच्यु ऑफ युनिटी’ होते, ‘शिवस्मारक’ का नाही? – शिवनीतीचा सवाल*

* २०१६ साली अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकासाठी ‘जलपूजन’ मोठ्या थाटात झाले. १० वर्ष झाली. ३६०० कोटींचा खर्च कागदावर दाखवला गेला. पण प्रत्यक्षात समुद्रात ‘वीट’ सुद्धा रचली गेली नाही.

*उलट गुजरातच्या केवडिया येथे ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ ३३ महिन्यात पूर्ण झाली.* ३००० कोटी खर्चून जगातील सर्वात उंच पुतळा उभा राहिला. आज वार्षिक ३ कोटी पर्यटक, महसूल सुरू.

*मग महाराजांचे स्मारक का नाही?* हा ‘खडा सवाल’ शिवचरित्राचे अभ्यासक राजू देसाई यांनी उपस्थित केला.

*’पुतळा नंतर, आधी गड दुरुस्त करा’*
राजू देसाई स्पष्टपणे सांगतात: _”हजारो कोटी समुद्रात घालवण्या ऐवजी रायगड, प्रतापगड, सिंहगड, सिंधुदुर्ग यांची डागडुजी करा. राज्यातील ३५० पैकी २१० किल्ले आज ‘धोकादायक’ अवस्थेत आहेत. पावसात बुरुज ढासळताहेत. शिवनेरीवर मूलभूत सुविधा नाहीत. गड-दुरुस्तीसाठी मात्र वर्षाला फक्त २०० कोटींचे तुटपुंजे बजेट. तीच खरी शिवस्मारकं आहेत. शिवरायांनी गड-किल्ले बांधले, समुद्रात पुतळे नाही.”_

*’कोळी बांधवांचे काय?’*
स्मारकामुळे स्थानिक कोळी समाजाने विरोध केला. _”समुद्रात स्मारक झालं तर मासेमारी बंद होईल. हजारो कोळी कुटुंबं उद्ध्वस्त होतील. शिवरायांनी कोळ्यांना ‘आरमाराचे सरदार’ बनवलं. आज त्यांच्याच पोटावर पाय देणार?”_ हा सवालही महत्त्वाचा. स्मारकासाठी २३ कोर्ट केस प्रलंबित आहेत.

*’शिवनीती काय सांगते?’*
शिवरायांचे विचार फक्त ‘जयजयकारा’ साठी नाहीत, ‘जगण्यासाठी’ आहेत:

१. *’गड-किल्ले हेच राज्याचे खरे आधार’*
महाराजांनी आयुष्यभर गड बांधले, जिंकले, राखले. आज ३५० पैकी २१० किल्ले ढासळताहेत. रायगडाची तटबंदी पडते. ही शिवनीतीची पहिली हार आहे.

२. *’शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू नका’*
रयतेचा घास हिरावणारा राजा कसला? आज बोगस बियाणं, हमीभाव नाही, कर्जबाजारीपणा. कांदा १२०० ₹ ला गेला तरी शेतकरी उपाशी. ही शिवनीतीची दुसरी हार आहे.

३. *’रयत सुखी तर राजा सुखी’*
राज्याचा पाया ‘रयत’ आहे. आज गरोदर ताई 5 किमी पाणी आणते. ‘जल जीवन मिशन’ १००% फक्त कागदावर. बेरोजगार तरुण गाव सोडतो. ही शिवनीतीची तिसरी हार आहे.

४. *’परस्त्री मातेसमान माना’*
स्त्रीचा सन्मान ही शिवनीती. आज समुद्रात स्मारकासाठी ‘जलपूजन’ होते. पण त्याच किनाऱ्यावरची कोळीण, शेतकरीण उपाशी. ही शिवनीतीची चौथी हार आहे.

५. *’अष्टप्रधान मंडळ – गुणवत्तेवर निवड’*
महाराजांनी ८ मंत्री गुणवत्तेवर नेमले. भ्रष्टाचाराला जागा नव्हती. आज ‘जलपूजन’ करून १० वर्ष फाईल गायब. टक्केवारी, टेंडर, वशिला. ही शिवनीतीची पाचवी हार आहे.

६. *’जल हेच जीवन – आड बांधा, तळी खोद’*
महाराजांनी प्रत्येक गडावर पाण्याची सोय केली. आज गावोगावी पाण्यासाठी वणवण. नदी-नाले कोरडे. ही शिवनीतीची सहावी हार आहे.

*’इच्छाशक्तीचा’ फरक – जिथे ‘चाह’ तिथे ‘राह’*
*’स्टॅच्यु ऑफ युनिटी’* – घोषणा २०१०. भूमिपूजन २०१३. पूर्ण २०१८. ५वर्षात ३००० कोटी खर्च. ३३ महिन्यात प्रत्यक्ष काम पूर्ण. यासाठी  केंद्राने ‘विशेष कायदा’ केला. २ महिन्यात जमीन मिळाली. L&T ला ‘डेडलाईन’ दिली. पंतप्रधानांनी दर महिन्याला ‘आढावा’ घेतला. कारण ‘दिल्ली’ ची ‘इच्छाशक्ती’ होती.

*’शिवस्मारक’* – घोषणा २००४ ला. भूमिपूजन २०१६ ला झाले आज २०२६. १०वर्षात ‘शून्य’ प्रगती. ३६००कोटी मंजूर, पण समुद्रात ‘वीट’ नाही. CRZ परवानगी ४ वर्ष. कोळी विरोध ३ वर्ष. कोर्टात २३ केस. डिझाईन ५वेळा बदलले. अजून ‘टेंडर’ फायनल नाही. मुख्यमंत्री १०वर्षात २वेळा ‘बैठक’ घेतात कारण ‘मुंबई’ ची ‘इच्छाशक्ती’ नव्हती. फक्त ‘जलपूजन’ करून ‘फोटो’ काढले.

*’पैसा’ होता. ‘जागा’ होती. ‘तंत्रज्ञान’ होतं. ‘प्रामाणिकपणा’ नव्हता.*
राजू देसाई म्हणतात: _”इच्छा असती तर ३६०० कोटीत ३५० गड ‘सोन्यासारखे’ झाले असते. पर्यटन वाढलं असतं. स्थानिकांना रोजगार मिळाला असता. पण ‘इच्छा’ फक्त ‘मतां’ ची होती, ‘माती’ ची नव्हती.”_

*’सत्ताकारणाला’ जिथे ‘फायदा’ दिसतो तिथे ‘वेग’ येतो. ‘शिवकार्याला’ फक्त ‘जलपूजन’ मिळते.*

*’राज्याभिषेक की शिवराजाभिषेक?’*
इतिहास अभ्यासक हरीश पाटील यांचे परखड मत – _”रायगडावर अभिषेक ‘राजांवर’ झाला, ‘राज्यावर’ नाही. म्हणून त्याला ‘शिवराजाभिषेक’ म्हणतात. आज ‘राज्याभिषेक’ करून फक्त ‘राज्य’ मिळवलं जातंय. ‘राजा’ च्या विचारांना, नीतीला अभिषेक कोणी करत नाही.”_

*’विचारही बुडवायचेत का?’*
आज ‘जय शिवाजी’ म्हणून मतं मागितली जातात. पण ‘शिवाजी’ जगून कारभार केला जात नाही. पुतळा समुद्रात बुडतोयच, पण रोज ‘शिवनीती’ बुडवली जाते.

*शेवटी एकच मागणी:*
*’कृती करा. जनतेच्या आशीर्वादाने उर अभिमानाने फुगू दे.’*

पुतळा नंतर बांधा. आधी गड दुरुस्त करा. शेतकऱ्याला न्याय द्या. कोळ्याला जगू द्या. ताईला पाणी द्या. कारण शिवरायांनी ‘मातीसाठी जगायला’ शिकवलं. ‘मूर्तीसाठी’ नाही.

*मूर्ती समुद्रात नको… शिवनीती कृतीत हवी.*

*#शिवनीती #गडकिल्ले_वाचवा #रयतेचा_राजा #कृती_करा #माईमीडिया24*

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here