Home मुंबई *आंबवणे गाव प्रीमियर लीग २०२६ ; एकतेचा, उत्साहाचा आणि गाव विकासाचा प्रेरणादायी...

*आंबवणे गाव प्रीमियर लीग २०२६ ; एकतेचा, उत्साहाचा आणि गाव विकासाचा प्रेरणादायी सोहळा ; युवकांनी घेतला पुढाकार*

11
0

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात असलेल्या आंबवणे गावात युवकांनी एकत्र येऊन सध्या गाजत असलेल्या प्रख्यात इंडियन प्रीमियर लीग च्या (आयपीएल) धर्तीवर आंबवणे गाव प्रीमियर लीग (AGPL) २०२६ ही स्पर्धा सुरु केली आणि गाव, तालुका, जिल्हाच नव्हे तर संपूर्ण देशाला एकतेचा, समतेचा संदेश दिला. कोकणातील सुपूत्र आणि मुंबईत कार्यरत असलेले उद्योजक विजय धोंडू घरटकर यांनी आपल्या गावात युवकांनी एकत्र येऊन विधायक कार्य करावे या हेतूने आंबवणे गाव प्रीमियर लीग (AGPL) २०२६ ही स्पर्धा सुरु केली. ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता गावातील एकोपा, सामाजिक बांधिलकी आणि विकासाची भावना अधिक दृढ करणारा भव्यदिव्य सोहळा ठरला. विजय घरटकर यांच्या प्रेरणेने गावातील काही तरुणांनी पुढाकार घेत सर्व ग्रामस्थांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले होते.

स्पर्धेच्या नियोजनादरम्यान आर्थिक सहाय्याचा मोठा प्रश्न उभा होता. मात्र गावातील मान्यवर व्यक्तींनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे हा उपक्रम यशस्वीपणे साकार झाला. विशेषतः विजय घरटकर यांनी सुरुवातीपासूनच भक्कम पाठिंबा देत आयोजकांना प्रोत्साहन दिले. तसेच घरटकर भगिनींनीही आयोजकांचा सन्मान करून त्यांचे मनोबल वाढविले. तसेच मुलींना सुद्धा अशा क्रीडा स्पर्धांमध्ये सामील करा, असा सल्ला दिला.

या स्पर्धेच्या यशामागे विनायक कावणकर, नितेश धामणे, नितेश घवाले, संदीप धामणे, विवेक कावणकर, मनोहर घरटकर, लंकेश घवाले, रोहन बेकर, जयेश भुवड तसेच सर्व संघमालक आणि स्वयंसेवक यांचे अथक परिश्रम मोलाचे ठरले. तब्बल १५० हून अधिक खेळाडूंना एकाच व्यासपीठावर आणून गावातील एकता, प्रेम आणि बंधुभावाचे दर्शन घडविण्याचे कार्य त्यांनी केले.
स्पर्धेला अनेक
ग्रामस्थ, क्रिकेटप्रेमी, आयोजक आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
याप्रसंगी महादेव रा. धामणे अध्यक्ष सार्वजनिक धामणे ग्रामस्थ मंडळ मुंबई, शंकर बांद्रे, अध्यक्ष; विजय घरटकर, सचिव; रमेश भुवड, अध्यक्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरेश होडबे, सचिव; सौ.विमलताई धामणे, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य; डॉ. सुशांत बांद्रे, मंजन चोरगे, दीपक धामणे, रुपेश बांद्रे, मुकुंद धामणे, रमेश शिगवण, सचिन होडबे, महेंद्र शिगवण, अमोल घरटकर, कुपचंद्र धामणे, संतोष गजमल, चंदू खेरटकर, सुदेश बांद्रे, नामदेव बांद्रे, श्याम चोरगे, पांडुरंग राहटवळ, अनंत कावणकर, दिनेश धामणे, श्रीकांत होडबे, विनायक धामणे, सतीश घवाले, निखिल धामणे, सचिन धामणे, स्वप्नेश भुवड, विशाल कावनकर तसेच अनेक ग्रामस्थ, उपस्थित होते. या सर्वांच्या प्रयत्नांनी खेळाच्या मैदानावर निर्माण झालेला उत्साह, सकारात्मकता आणि सहकार्याची भावना ही गावाच्या भविष्यातील विकासासाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केले की, गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास अनेक विकासकामांना गती मिळू शकते. मतभेद बाजूला ठेवून गावहितासाठी एकत्रितपणे काम करणे ही आजची गरज आहे. रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकास यांसारख्या विविध क्षेत्रांत एकजुटीच्या बळावर मोठी प्रगती साधता येऊ शकते.

श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आंबवणे बुद्रुक यांनीही गावाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी यापुढेही सकारात्मक सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.

आंबवणे गाव प्रीमियर लीग २०२६ ने केवळ विजेतेपदाचा उत्सव साजरा केला नाही, तर गावाच्या एकतेचा, अभिमानाचा आणि सामाजिक सलोख्याचा नवा आदर्श निर्माण केला आहे. भविष्यातही अशीच एकजूट कायम राहून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here