Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा *देवदत्त नागेचा दमदार नवा लूक, ‘घबाडकुंड’मुळे वाढली उत्सुकता*

*देवदत्त नागेचा दमदार नवा लूक, ‘घबाडकुंड’मुळे वाढली उत्सुकता*

28
0

आतापर्यंत प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर आलेला अभिनेता देवदत्त नागे आता पुन्हा एकदा नव्या आणि दमदार अवतारात दिसणार आहे. आपल्या भूमिकांमध्ये नेहमीच वैविध्य जपणाऱ्या देवदत्त नागे यांचा ‘घबाडकुंड’ या आगामी चित्रपटातील लूक विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

प्रत्येक भूमिकेत नवं काहीतरी सादर करत त्यांनी स्वतःची वेगळी आणि ठळक ओळख निर्माण केली आहे.
आता मात्र देवदत्त एका पुर्णपणे नव्या आणि अनपेक्षित अवतारात प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाले आहेत.

‘घबाडकुंड’ या आगामी चित्रपटामधील ‘खंग्री’ या त्यांच्या भूमिकेचा रांगडेपणा तीव्र आणि गूढ लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तीक्ष्ण नजर आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्स यामुळे त्यांच्या या व्यक्तिरेखेभोवती रहस्यमय आकर्षण निर्माण झालं आहे.

या चित्रपटासाठी त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात केलेला बदल, त्यासाठी घेतलेली मेहनत यांतून त्यांचा हा लूक अधिक प्रभावी ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे. काहीतरी वेगळं सादर करण्याची देवदत्त नागे यांची खासियत या नव्या अवतारातूनही ठळकपणे दिसून येत आहे.

प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच या चित्रपटाबद्दल उत्सुकता असून, देवदत्त नागे यांच्या या दमदार लूकमुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘घबाडकुंड’मधून प्रेक्षकांना एक वेगळाच थरार अनुभवायला मिळणार आहे. कल्पनेच्या पलीकडचं ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर साकारण्याचा धाडसी प्रयत्न दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी केला आहे. निर्माते डॉ. रसिक कदम यांची भक्कम साथ या चित्रपटासाठी लाभली आहे. ‘आयकॉन दी स्टाईल’ या निर्मितीसंस्थे अंतर्गत साकारलेला मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स ‘घबाडकुंड’ येत्या १९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here