Home मुंबई *बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा कांचन सावंत यांनी सादर केला सुरेल नजराणा ,अवघी...

*बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा कांचन सावंत यांनी सादर केला सुरेल नजराणा ,अवघी डोंबिवली सूरसंगीतांनी न्हाऊन निघाली*

71
0

मुंबई,

* खानदेश रत्न कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या अनमोल कवितांचा ठेवा कु. कांचन संतोष सावंत हिच्या सुरेल व कसदार आवाजात उलगडत गेला माझी माय सरसोती या गाण्याने सुरुवात झाली नंतर कशाला काय म्हणू नये हे अध्यात्मिक शिकवण सांगणारी गीत झाले. बिना कपाशीने उले त्यानंतर जीवनाची वाटचाल करण्यासाठी तत्त्वज्ञान सांगणारे वाटच्या वाटसरा आले. तसेच कर्मयोगी याचे जीवन सांगणारे अरे घरोटे घरोटे! आईच्या ममतेने व्याकुळलेले उचलला हारा. जन्ममृत्यूतील संघर्ष जीव देवाने धाडला संगीत उदय चितळे सर मुलतानी निसर्गात रमणाऱ्या बहिणाबाई यांनी निसर्ग कवियत्रीच होतं. अरे खोप्यामध्ये खोपा पाठोपाठ येतं मन वढाय वढाय पाण्यागत असणाऱ्या मनाला शब्दात पकडणारे आखजीचा आखाजीचा हे अक्षय तृतीयेच्या सणाचं वर्णन करणार गीत येतं. परशुराम बेलदार या भक्तीमय गीत गायनाने समारोप झाला. रसिक प्रेक्षकांनी अतिशय मनःपुर्वक दाद देऊन कार्यक्रमाला रंगत आणली अधिक मासातील या अधिकाधिक आनंद देणाऱ्या कार्यक्रमात पाहुणे अशोक कुलकर्णी स्वामी सिरीयल चे प्रमुख भूमिका, जीवनविद्या मिशनचे कीर्तनकार भारुड मधुकर पांचाळ, जीवनविद्या मिशन चे संगीतकार भजन सम्राट ठीक सेन बानकर, प्रबोधनकार दशरथ शिरसाट, प्रसारक कीर्तनकार आबू परब, हरिश्चंद्र सरदार पत्रकार अनिकेत घमंडे यांच्या समवेत अनेक मान्यवर उपस्थित होते. या नितांत सुंदर कार्यक्रमाचे प्रयोजक होते कुलकर्णी ब्रदर्सचे श्रीरंग कुलकर्णी. कार्यक्रमाला चार चांद लावणारे निवेदन होते दिनेश आडावदकर यांचे. अप्रतिम साथ संगत करून कु. कांचन संतोष सावंत हिच्या गाण्याला रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे वादक व संगीत संयोजक उदय चितळे तबला मकरंद विष्णुपुरीकर शिंदे डॉक्टर प्रमोद धोरे, तबलावादक व्यंकटेश कुलकर्णी ,ध्वनी व्यवस्थापक आनंद गोरे यांनी या कार्यक्रमाला परमोच्च बिंदू गाठला. अवघी डोंबिवली सूरसंगीतांनी न्हाऊन निघाली.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here