Home पुणे पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

14
0

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा घसरला. सोमवार २७ एप्रिल २०२६ संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. प्लॅटफॉर्मवर येताना डायमंड क्रॉसिंग येथे वंदे भारत एक्सप्रेसचा डबा घसरला. गाडीचा वेग कमी होता त्यामुळे डबा घसरला तरी जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

स्टेशनमध्ये प्रवेश करत असताना गाडीचा वेग कमी होता. डायमंड क्रॉसिंग येथून पुढे जात असताना वंदे भारत एक्सप्रेसच्या चौथ्या डब्याची एक ट्रॉली रुळावरून घसरली. काय झाले आहे हे लक्षात येताच तातडीने आवश्यक ते उपाय करण्यात आले. प्रवाशांना पर्यायी गाडीने पुढील प्रवासाला रवाना करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here