Home मुंबई *मुंबई मनपाची स्थापत्य समिती (शहर), स्थापत्य समिती (उपनगरे) निवडणूक बिनविरोध*

*मुंबई मनपाची स्थापत्य समिती (शहर), स्थापत्य समिती (उपनगरे) निवडणूक बिनविरोध*

37
0

*- स्थापत्य समिती (शहर) सभापतीपदी यामिनी जाधव, उप सभापती पदी अजय पाटील यांची निवड*

*- स्थापत्य समिती (उपनगरे) सभापतीपदी संगीता शर्मा, उप सभापती पदी सुरेश आवळे यांची निवड*

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती (शहर) सभापती, उपसभापती आणि स्थापत्य समिती (उपनगरे) सभापती, उपसभापती पदासाठीची निवडणूक गुरुवार दि. १२ मार्च रोजी महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. शहर आणि उपनगरे येथील स्थापत्य समितीकरिता सभापती आणि उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशन प्राप्त झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली.

स्थापत्य समिती (शहर) सभापती पदासाठी शिवसेना पक्षाच्या श्रीमती यामिनी यशवंत जाधव यांचे एकमेव नामनिर्देशन प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तसेच स्थापत्य समिती (शहर) उप सभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाचे श्री. अजय किसन पाटील यांचे एकमेव नामनिर्देशन आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यासोबतच, स्थापत्य समिती (उपनगरे) सभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या संगीता शर्मा यांचे एकमेव नामनिर्देशन प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तसेच स्थापत्य समिती (उपनगरे) उप सभापती पदासाठी शिवसेना पक्षाचे सुरेश आवळे यांचे एकमेव नामनिर्देशन आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पीठासीन अधिकारी म्हणून महापौर रितू तावडे, उप महापौर संजय घाडी यांनी कामकाज पाहिले. यावेळी स्थापत्य समिती (शहर) आणि स्थापत्य समिती (उपनगरे) यांच्या सदस्यांसह प्रमुख अभियंता (पर्यावरण व वातावरणीय बदल) प्रदीप गवळी, महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे आदी उपस्थित होते.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here