Home मुंबई *वित्तीय वर्ष २०२६ – २०२७ चे अर्थसंकल्‍पीय अंदाज स्थायी समिती व शिक्षण...

*वित्तीय वर्ष २०२६ – २०२७ चे अर्थसंकल्‍पीय अंदाज स्थायी समिती व शिक्षण समितीला सादर*

51
0

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वित्तीय वर्ष २०२६ – २७ चे शिक्षण खात्याचे ‘ई’ अर्थसंकल्‍पीय अंदाज शिक्षण समितीमध्ये अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पुर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी तर स्थायी समितीमध्ये ‘अ’, ‘ब’ आणि ‘ग’ हे अर्थसंकल्पीय अंदाज महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बुधवार दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर केले.

स्थायी समिती सभेत, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सन २०२६ – २०२७ चे अर्थसंकल्पीय अंदाज सादर केले. तर, शिक्षण समिती सभेत, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी सन २०२६ – २०२७ चे अर्थसंकल्पीय अंदाज सादर केले.

या प्रसंगी शिक्षण समिती सदस्य आणि स्‍थायी समिती सदस्य यांसमवेत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, महानगरपालिका सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वित्तीय वर्ष २०२६ – २०२७ चे अर्थसंकल्‍पीय अंदाज महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर खालील नमूद जोडणी (लिंक) वर उपलब्ध आहेत.

https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlBEst2627
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here