Home मुंबई *सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन निधीत भरीव वाढ करण्याची पालकमंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे...

*सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन निधीत भरीव वाढ करण्याची पालकमंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*

67
0

*जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ च्या राज्यस्तरीय बैठकीत सिंधुदुर्गातील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांसमोर आढावा*

मुंबई
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत्या विकासाच्या गरजा, पर्यटनवाढ, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विचार करता जिल्हा नियोजन निधीत भरीव वाढ करण्याची मागणी पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ चे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी गुरुवारी मुंबई येथील वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जैसवाल, आमदार दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पर्यटनदृष्ट्या महत्त्वपुर्ण असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, पर्यटन पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती तसेच ग्रामीण व नागरी भागातील विकासकामांची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या सुरू असलेल्या तसेच आगामी काळात प्रस्तावित विकासकामांची प्रभावी, दर्जेदार व वेळेत अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा नियोजन निधीत वाढ करण्याची मागणी या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या तसेच आगामी काळात प्रस्तावित विविध विकासकामांचा सविस्तर आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडत, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक निधीची गरज स्पष्ट केली.

०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here