*काळ सोन्याचा पण तरीही बाका! रितु ताई सावधान आणि तैयार रहा!*
*भाजपने मुंबईच्या महापौरपदी निवड केलेल्या रितू तावडे घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १३२ मधील नगरसेविका ज्या तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्यात..*
*रितू तावडे यांनी २०१२ मध्ये काँग्रेस पक्षातूून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी महापालिका निवडणुकीत निवडून आल्या. त्यांना महापालिकेच्या शिक्षण समितीचं अध्यक्षपदही दिलं गेलं.*
*त्या मुंबई महानगरपालिका उपनगरे स्थापत्य समितीच्या उपाध्यक्ष होत्या. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. तर भाजपच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष ही राहिल्या आहेत.*
*तसेच भाजपच्या मुंबई महिला मोर्चाच्या कार्यक्रम समिती संयोजिका, ईशान्य मुंबई महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा म्हणूनही तावडे यांनी काम केले आहे. सोबत सहारा जनरल कामगार कर्मचारी संघटनेच्या त्या स्वतः संस्थापक आहेत.*
*आपल्याला आठवत असेल तर अंतवस्त्र विक्री करणाऱ्या दुकानांबाहेर महिलांचे पुतळे कमी कपडे किंवा अंतर्वस्त्र परिधान केलेले पुतळे दर्शनी भागात लावले जायचे.या विरोधात रितू तावडे यांनी आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी या आंदोलनांमुळे त्या चर्चेत आल्या . त्यावेळी पालिकेत या मुद्यावरून त्यांनी ‘नोटीस ऑफ मोशन’द्वारे दाद ही मागितली होती.*
*वीज दरवाढी विरोधात आंदोलन आणि मिठी नदीतील गाळ काढतारे ठेकेदार लहान मुलांचा वापर करत होते . त्यांनी बाल कामगारांची मुक्तता केल्याचा मुद्दाही चर्चेत आला होता. अशा कृतीशील मराठी पण गुजरात बहुल भागातून निवडून आलेल्या कोकण कन्या रितु तावडे यांची निवड मुंबई च्या महापौर पदासाठी भाजपने केली .*
*शिवसेना वा इतर कोणत्याही पक्षाने महापौर पदासाठी अर्ज न भरल्याने ही निवडणूक त्यांनी बिनविरोध जिंकली आहे.*
*मुंबई महापालिका निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर महायुतीमध्ये महापौरपद हे भाजपकडेच राहणार हे स्पष्ट होते. पण, तब्बल २५ वर्षांनंतर शिवसेनेच्या हातातून महापौर पद गेल्यानंतर महायुतीतल्या शिवसेनेकडून नेमक्या काय वाटाघाटी केल्या जातात,* *याकडेही सर्वांचं लक्ष होतं.*
*अखेर भाजपने रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करून पाच वर्षांसाठी भाजपचाच महापौर असेल हे स्पष्ट केलं.*
*महापौर पद हे खुल्या प्रवर्गात महिला राखीव असल्याने भाजपने निवडून आलेल्या महिलांपैकी नेमकी कोणाला संधी दिली जाईल याचीही चर्चा होती. यात रितू तावडे, शीतल गंभीर, राजश्री शिरवाडकार, आशा मराठे अशी आणखीन काही नावं स्पर्धेत असल्याची चर्चा होती.*
*मात्र अजुनही पडद्याआड चर्चा होत आहे, भाजपतील काही महिला नाराज असल्याचीही माहिती देणारी सूत्र तेजीत आहेत.*
*मुंबई महानगरपालिका निवडणूक ही खरं तर मराठी अस्मितेच्या मुद्यावर लढवली गेली. यातला मुख्य महत्त्वाचा मुद्दा होता मुंबईचा महापौर मराठीच असला पाहिजे. शिवसेना ठाकरे गट असो वा मनसे यांनी त्यांच्या प्रचार सभांमध्ये वारंवार ही भूमिका स्पष्ट केली होती की मुंबईचा महापौर मराठीच असेल. मराठी विरुद्ध अमराठी असा वाद आणि राजकारण निवडणूकीत रंगल्याचेही दिसले होतं. याला प्रत्युत्तर देत महायुतीने आपल्या सभांमध्ये मुंबईचा महापौर हा मराठी-हिंदू असेल असं जाहीर केलं.*
*मधेच “मराठी माणसाचं हित..” , या विषयावर मुख्यमंत्री ठणाकावून बोलताना दिसले.*
*यामुळे हे स्पष्ट होतं की, महायुतीला बहुमत मिळालं असले तरी महापौर हा मराठी भाषिकच द्यावा लागणार! महापौर पदाच्या सोडतीत ही जागा खुला प्रवर्ग आणि महिला राखीव अशी जाहीर करण्यात आली.*
*भाजपने यानिमित्ताने महिला आणि मराठी म्हणून रितू तावडे यांची निवड केली .*
*दुसरीकडे भाजपने गुजराती ‘मताच्या गठ्ठ्यालाही धक्का लागू दिला नाही. रितु तावडे या गुजराती बहुल भागातून निवडून आल्या आहेत. गुजराती बहुल मतदारसंघातल्या मराठी चेहरा अशी त्यांची ओळख आहे.*
*यामुळे भाजपने गुजराती आणि मराठी असा समतोल साधलाय.*
*मुंबई महापौर पदाची जबाबदारी, हे काम तितके सोपं नाही, आव्हाने अनेक आहेत. विरोधक व अंतर्गतही असू शकतील, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.*
*रितू तावडे यांना यापूर्वी शिक्षण समितीचा आणि मनपाच्या कामकाजाचा अनुभव असला तरी गेली चार वर्ष *महानगरपालिकेची निवडणूक झालेली नव्हती. यामुळे प्रशासनाच्या माध्यमातूनच पालिकेचं कामकाज झालेलं आहे. कामाचा डोलारा मोठा आहे.*
*या परिस्थितीत रितू तावडे यांच्यासमोर शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि मनसे हे तीन पक्ष मुख्य विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहेत.*
*मागील २५वर्षांपासून ही मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात राहिली अशी मुंबईची महानगर पालिका भाजपकडे गेल्यावर शिवसेना ( उबाठा ) विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहे. म्हणजे विरोध तयारीचा असेल हे नक्कीच!*
*विरोधकांमध्ये ४ महापौर आणि १ उपमहापौर आहेत. तर विरोधी बाकावरच्या नगरसेवकांची संख्या मोठी आहे. यामुळे रितू तावडे यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या हे एक मोठं आव्हान असणार आहे.*
*महापौरपदी नावाची घोषणा झाल्यानंतर रितू तावडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “४४ वर्षांनंतर भाजपचा महापौर विराजमान होणार आहे. मुंबईकरांनी महायुतीला कौल दिला आहे. २५ वर्षांचा भ्रष्टचाराचा कारभार होता. तिन्ही पक्ष एकत्र येऊनही मुंबईकरांनी महायुतीला कौल दिला आहे.”*
*हे सगळं छान अभिनंदनीय असले तरी, मुंबईतील महत्त्वाचे आणि गंभीर प्रश्न हाताळण्याचं आव्हान रितू तावडे यांच्यासमोर आहे.*
*मुंबईत अनेक ठिकाणी बांधकामे सुरू असल्याने वाहतूक कोंडी आणि प्रदुषणाचा प्रश्न मोठा आहे.*
*मुंबईतील वाहतूक कोंडी, फेरीवाले, फुटपाथ, हॉस्पिटल्सची दूरावस्था, अनधिकृत बांधकामे अशा अनेक प्रश्नांवर त्यांना येत्या काळात आपलं काम आणि उत्तरं द्यावी लागणार आहेत.* *यामुळे हे प्रश्न त्या कशापद्धतीने हाताळतात हे पहावं लागेल.*
*काळ तर मोठा सोन्याचा पण तितकाच बाका आलाय!*
*रितु ताई सावधान आणि तैयार रहा! हा मुकुट मोठा टोकदार, जबाबदारी चा आहे.*
***!





















