Home मुंबई *प्रभाकर मोरे यांनी केलेल्या विकासकामांची आठवण ठेवा*

*प्रभाकर मोरे यांनी केलेल्या विकासकामांची आठवण ठेवा*

61
0

*आमदार प्रवीण दरेकरांचे करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघात आवाहन*

मुंबई – माजी मंत्री प्रभाकर मोरे यांनी सर्वार्थाने महाड-पोलादपूरमध्ये विकास आणला. गावागावात रस्ते, नळ-पाणीपुरवठा योजना आणून मोठ्या प्रमाणावर विकासाला गती दिली याची आठवण ठेवून प्रभाकर मोरे यांचे चिरंजीव अमित मोरे यांना करंजाडी जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून द्यावे, असे आवाहन भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील मांडवकर कोंड याठिकाणी झालेल्या प्रचारसभेत बोलताना केले.

काल आमदार प्रवीण दरेकर यांनी करंजाडी जिल्हा परिषद मतदार संघाचा धावता दौरा करत मांडवकर कोंड, फौजी आंबवडे व ताम्हणे या गावी भेटी देऊन छोटेखानी सभा घेतल्या. या सभांमधून भाजपा-राष्ट्रवादीला मतदान करण्याचे आवाहन केले व जिल्हा परिषद मतदारसंघातून अमित मोरे यांची कमळ या निशाणीसमोरील व सुमित तुपट यांना पंचायत समिती गणातून घड्याळासमोरील बटण दाबून निवडून देण्याची विनंती केली.

केंद्रामध्ये भाजपा-एनडीएचे सरकार आहे. राज्यामध्ये भाजपा युती सरकार आहे. या दोन्ही सरकारच्या माध्यमातून करंजाडी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासासाठी भरघोस निधी आणू हा विश्वासही आ. प्रवीण दरेकर यांनी या दौऱ्यादरम्यान मतदारांना दिला. तसेच जिल्हा परिषदेवर भाजपा व राष्ट्रवादीची सत्ता नक्की येणार असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गाववाड्या, वस्त्यांचा सर्वांगीण विकास गतीने करू, असा विश्वासही आ. प्रवीण दरेकरांनी सर्व ग्रामस्थांना झालेल्या बैठकांमधून दिला.

याप्रसंगी सरपंच सचिन पवार, माजी सरपंच वासुदेव पवार, माजी उपसभापती सुरेखा पवार, अनिल परशुराम बेल, श्रीधर सकपाळ, अमृत मांडवकर, सुहास पवार, मनोज खिलजे, चंद्रकांत मांडवकर, मिलिंद कासारे, संदीप जाधव, आनंद चव्हाण, कृष्णराम चव्हाण, दिलीप पवार, बाळकृष्ण आंबेडे, सुनिल बोरेकर, हरिश्चंद्र कदम, महादेव गुडेकर, अल्पेश चव्हाण, तातोबा चव्हाण, दत्तात्रय आंबेडे, अशोक खामकर, संगीता बोरेकर, मंजुळा चव्हाण, स्वप्नाली खामकर, आशा रांगडे यांसह भाजपा-राष्ट्रवादी युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

*फोटो ओळ*

मांडवकर कोंड येथे ग्रामस्थांना संबोधित करताना आ. प्रवीण दरेकर सोबत जिल्हा परिषद उमेदवार अमित मोरे, पंचायत समिती उमेदवार सुमित तुपट, राष्ट्रवादीचे नेते नाना जगताप, श्रीधर सकपाळ बेल आदी मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here