Home Uncategorized *’पाकिस्तानचं यान’ एकांकिकेला ‘गोपीनाथ सावकार पुरस्कार’…*

*’पाकिस्तानचं यान’ एकांकिकेला ‘गोपीनाथ सावकार पुरस्कार’…*

56
0

*बोलीभाषा एकांकिका स्पर्धा उत्साहात…*

‘सुप्रिया प्रॉडक्शन’ आयोजित ९ वी ‘बोलीभाषा एकांकिका स्पर्धा’ २०२६ ची अंतिम फेरी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, माटुंगा येथे संपन्न झाली. या आगळ्यावेगळ्या एकांकिका स्पर्धेमध्ये ‘नाट्यांकुर, मुंबई’च्या ‘पाकिस्तानचं यान’ या ‘घाटी’ बोलीतील एकांकिकेने ‘अशोक सराफ व सुभाष सराफ पुरस्कृत’ प्रथम क्रमांकाचा ‘नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार’ पुरस्कार पटकावला. दुसऱ्या क्रमांकाचा ‘सुगंधा रामचंद्र कोंडेकर’ पुरस्कार ‘नाट्यारंभ, एन के टी टी, ठाणे’ च्या ‘सत्य’ या ‘मालवणी’ बोलीतील एकांकिकेने आणि तृतीय क्रमांकाचा ‘स्व.हरिश्चंद्र चांगु कडू’ पुरस्कार ‘नक्षत्र कलामंच, मुंबई’च्या ‘पाकळ्या’ या खान्देशी बोलीतील एकांकिकेने मिळविला. ‘घाटी’ बोलीतील ‘डिझाईन’ या एकांकिकेने ‘प्रेक्षक पसंती’ पुरस्कार प्राप्त केला.

‘सुप्रिया प्रॉडक्शन’च्या सुप्रिया गोविंद चव्हाण यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. महाराष्ट्रातील बोलीभाषांमध्ये सादर होणाऱ्या एकांकिकांच्या या एकमेवाद्वितीय स्पर्धेची अंतिम फेरी मोठ्या उत्साहात पार पडली. या वर्षी या स्पर्धेत राज्यभरातून १० बोलींतील १८ एकांकिका सहभागी झाल्या होत्या. अंतिम फेरीसाठी ७ एकांकिकांची निवड करण्यात आली होती. यंदा या स्पर्धेचे नववे वर्ष होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. मिलिंद शिंदे, संदीप रेडकर व मंगेश सातपुते यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here