गेली तब्बल *४५ वर्षे* आम्ही एकत्र सार्वजनिक जीवनात कार्यरत होतो. राज पुरोहित हे मुंबई भाजपचे अध्यक्ष होते आणि १९९९ साली मी ,राज पुरोहित, श्री. मंगलप्रभातजी लोढा आम्ही तिघे दक्षिण मुंबईतून आमदार म्हणून निवडून आलो तसेच स्व.जयवंतीबेन मेहता ह्या ही त्याचवेळी खासदार म्हणून निवडून आल्या.
*रामलीला सेवा समिती, ब्रिज मंडळ कृष्णलीला* यांसारख्या धार्मिक व सामाजिक संस्थांमध्ये आम्ही समर्पित भावनेने काम केले.
राज पुरोहित ह्यांची भाडेकरू संघटना होती त्या माध्यमातून पगडी बिल्डिंगच्या समस्या सोडवल्या, ते गृहनिर्माण मंत्री असताना त्यांनी म्हाडामध्ये *३३/७* चे महत्त्वपूर्ण प्रावधान आणले, ज्यामुळे मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग खुला झाला आणि लाखो मुंबईकरांना दिलासा मिळाला.
आम्ही एकत्र देश विदेशच्या यात्रा केल्या *१९८०* च्या अधिवेशनापासून सुरू झालेला आमचा सहप्रवास आज त्यांच्या निधनाने संपला असला, तरी त्यांचे कार्य, विचार आणि आठवणी कायम प्रेरणा देत राहतील.
त्यांच्या निधनाने माझा एक जिव्हाळ्याचा सहकारी आणि मुंबईने एक प्रभावी लोकप्रतिनिधी गमावला आहे.
*अतुल शाह*
*माजी आमदार, नगरसेवक,प्रवक्ता महाराष्ट्र भाजपा*

















