बदलापूर नगरपालिकेची सत्ता काबीज केल्यानंतर भाजपने शिंदेंंच्या सेनेला आणखी एक धक्का दिलाय. शिंदेंंच्या सेनेचे उपशहरप्रमुख प्रवीण राऊत यांच्यासह शिवसैनिकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. शिंदेसेनेत सुरु असलेली घराणेशाही मोडून काढण्यासाठीच हा पक्षप्रवेश केल्याची प्रतिक्रिया आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रवीण राऊत यांची पत्नी शीतल राऊत आणि वहिनी विजया राऊत या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. तर शिवसेनेच्याच नगरसेविका दीपाली लामतुरे यांचे पती गणेश लामतुरे यांनीही शिवसेना सोडून भाजपचं कमळ हाती घेतलेय, त्यामुळे पालिकेत भाजपची ताकद वाढलीय. आता प्रवीण राऊत यांना भाजपकडून स्विकृत नगरसेवकपद दिले जाणार असल्याची चर्चा आहे.

















