मुंबई
” ‘नॅशनल हेराल्ड’ हे काँग्रेसशी संबंधित वृत्तपत्र राहिले आहे.नॅशनल हेराल्डबाबत अनेक वेळा जाहीर चर्चा झाली आहे. त्यातील गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी करून काँग्रेस नेते राहुल गांधी , सोनियाजी गांधी यांच्यावर आरोप केले आहेत.हा संपूर्ण कायदेकानूनचा विषय आहे.या प्रकरणाशी केंद्र सरकार चा काही संबंध नाही.यात राजकारण कोणी करू नये.हा तपास यंत्रणांच्या कामकाजाचा भाग आहे .” अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
“नॅशनल हेराल्ड प्रकरणी नव्याने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनियाजी यांच्यावर एफ आय आर दाखल झाला आहे.या प्रकरणात केंद्र सरकार चा काहीही संबंध नाही.राहुल गांधी यांना वाटत असेल त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा चुकीचा आहे तर त्यांनी वकीलाद्वारे कायदेशीर आपली भूमिका मांडून त्यास आव्हान देऊ शकतात.” असे ना. रामदास आठवले म्हणाले.


















