Home Uncategorized *१०१ वे अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन मार्च २०२६ मधे!*

*१०१ वे अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन मार्च २०२६ मधे!*

387
0

*अध्यक्ष पदासाठी नावे पाठवण्याचे परिषदेेचे आवाहन*

अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेतर्फे मार्च २०२६ साली संपन्न होणाऱ्या नियोजित ‘१०१ व्या अखिल भारतीय मराठी नाटय संमेलना’ च्या अध्यक्षपदासाठी घटनेच्या कलमानुसार परिषदेच्या सभासदांकडून नावे मागविण्यात येत आहेत. सदस्यांनी आपले सूचना पत्र सूचित व्यक्तीच्या लेखी संमतीसह आणि सूचक व अनुमोदक यांच्या स्वाक्षरीसह परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाटय संकुल, मनमाला टँक रोड, माहिम, मुंबई ४०० ०१६ येथील कार्यालयात सोमवार, दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ७.०० वाजेपर्यंत सीलबंद लखोटयात सादर करावे. त्यानंतर आलेल्या सूचना पत्रांचा विचार केला जाणार नाही. सूचक, अनुमोदक व सूचित व्यक्ती या नियामक मंडळाचा सदस्य असता कामा नयेत. मात्र ते परिषदेचे आजीव सदस्य असले पाहिजेत, तसेच संमेलना’च्या अध्यक्षपदासाठी सुचवलेली व्यक्ती परिषदेचे किमान दोन वर्षे आजीव सदस्य असले पाहिजेत, ह्याची दक्षता सभासदांनी सूचना पत्र पाठविताना घ्यावी.
असे आवाहन अ.भा.म.नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी परिषदेच्या सभादांंना प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here