Home Uncategorized *आंदोलकाच्या कंबरेत लाथ घालणं! जालन्याच्या पोलिस अधिकाऱ्याला दणका*

*आंदोलकाच्या कंबरेत लाथ घालणं! जालन्याच्या पोलिस अधिकाऱ्याला दणका*

70
0

आंदोलकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या कंबरेत ‘फिल्मी स्टाईल’ लाथ घालणे पोलिस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांना भोवण्याची शक्यता आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि जालना जिल्हा पोलिस अधीक्षकांना नोटीस बजावली आहे.
अमित चौधरी आणि गोपाल चौधरी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बरेच दिवस उपोषण करत होते. मात्र दखल न घेतल्याने त्यांनी स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे दाद मागण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी ध्वजारोहणासाठी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मुंडे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.
याचा राग आल्याने उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी चौधरी यांना बाजूला केले. पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतले. मात्र ताब्यात घेतल्यानंतरही कुलकर्णी यांनी अगदी फिल्मी स्टाईलने उडी मारून चौधरी यांच्या कमरेत लाथ घातली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होत. यानंतर कुलकर्णी यांच्यावर कारवाईची मागणी सुरु होती.
याबाबत वंचित बहुजन आघाडीने याबाबत मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती. याच तक्रारीची आयोगाने गांभीर्याने दखल घेतली आहे. आयोगाचे अध्यक्ष आणि निवृत्त न्यायमूर्ती ए. एम. बदर यांनी या प्रकरणी आयोगातर्फे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि जालना जिल्हा पोलिस अधीक्षकांना या तक्रारीवर म्हणणे नोंदवण्यासाठी नोटीस बजावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here