मुंबई
आज रविवार दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने घाटकोपर विभागात भव्य जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली.
ही रॅली भटवाडी सिद्धी गणेश मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून येऊन सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक,अमृतनगर सर्कल येथे संपन्न झाली. समाजातील हजारो बंधू-भगिनी व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समाजाच्या ऐक्याचा आणि एकतेचा भक्कम संदेश दिला.
या रॅलीचे आयोजन माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आझाद मैदान आंदोलनाच्या समर्थनार्थ करण्यात आले होते. मराठा समाजाच्या हक्काच्या लढ्यात घाटकोपर विभागातील सर्व समाजबांधव एकदिलाने सहभागी होणार असल्याचा निर्धार या रॅलीमधून व्यक्त झाला.
ही बाईक रॅली फक्त निदर्शनापुरती मर्यादित न राहता, समाजाच्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी व समाज जागृतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली.
रॅली दरम्यान परिसरात “एक मराठा लाख मराठा”, “जय शिवराय – जय जिजाऊ” या घोषणांनी वातावरण दणाणून गेले.
भव्य बाईक रॅलीत समाजातील युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग.
मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला घाटकोपर मराठा समाजाचा ठाम पाठिंबा.पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी व समाज एकतेसाठी हे आंदोलन महत्त्वाचे असल्याचा संदेश.घाटकोपर परिसरात समाजबांधवांनी दिला एकजुटीचा दणदणीत आवाज.




















