आज कोंढवा (खु.) येथे शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते फित कापून शिवसेना जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले.
शिवसेना पक्षप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांनुसार – “ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण” – या कार्यालयातून नागरिकांची निःस्वार्थ सेवा करण्याचा संकल्प केला आहे. या कार्यालयातून विविध शासकीय योजना महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य होणार आहे. आपल्या परिसरातील शिवसेना बालेकिल्ला अधिक मजबूत करण्यासाठी आणि पक्षवाढीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जोमाने काम करणे गरजेचे आहे.
आजच्या सोशल मीडियाच्या युगात चांगले काम लोकांपर्यंत पोहोचवणे तितकेच महत्त्वाचे आहे. पुण्यातील कार्य हे महाराष्ट्रभर पोहोचावे, हीच अपेक्षा आहे. सतीश शिंदेजी आणि सुप्रिया शिंदे ताईंचे अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा! शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण मिळून शिवसेनेचे गतवैभव पुनःप्राप्त करू, असा विश्वास आहे, असे यावेळी बोलताना ना. उदय सामंत म्हणाले.



















