Home Uncategorized *पुणे प्रभाग क्र.२६ च्या विकासकामांचं ना. उदय सामंतांनी केले लोकार्पण*

*पुणे प्रभाग क्र.२६ च्या विकासकामांचं ना. उदय सामंतांनी केले लोकार्पण*

127
0

रहेजा चौक, हडपसर, पुणे येथे प्रभाग क्र. २६ महम्मदवाडीतील विविध रस्ते व शुभोभिकरण केलेल्या चौकाचे लोकार्पण राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते पार पडले.

ना सामंत म्हणाले की,” आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम नाना भानगिरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो. शासनाचा एकही पैसा न घेता, सर्व विकासकांना एकत्र करून PPP मॉडेलवर तब्बल ₹२७५ कोटींचे रस्त्याचे काम पूर्ण करणारा महाराष्ट्रातील एकमेव लोकप्रतिनिधी म्हणजे नाना भानगिरे! दोन वर्षांत हे काम पूर्ण करून त्यांनी विकासाचा नवा इतिहास घडवला.या चौकामुळे नागरिकांना वाहतुकीसाठी दिलासा मिळाला आहे, हे पाहून समाधान वाटते.
शिवसेना नेहमी “८०% समाजकारण, २०% राजकारण” या तत्त्वावर काम करते. पण नानांनी तर हृदय शस्त्रक्रिया अवघ्या ₹५०,००० मध्ये उपलब्ध करून देऊन १००% समाजकारणाचं उदाहरण घालून दिलं आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, शिवसेना प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठाम उभी आहे. कार्यकर्त्यांच्या ताकदीवर नेता मोठा होतो, पण आपल्या नेत्याच्या ताकदीवर कार्यकर्ते मोठे करण्याची ताकदही एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे.
पुण्याच्या सांस्कृतिक वारशाला साजेसा विकास आणि जनसेवा करण्याचं काम पुढेही सुरू ठेवू. महानगरपालिकेच्या निवडणुकीत नागरिकांनी अशाच विकासवादी विचारांना पाठिंबा द्यावा, हीच अपेक्षा करतो”, असे आवाहन ना. उदय सामंत यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here