Home Uncategorized *उत्तर महाराष्ट्रात ना. उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी बैठक संपन्न*

*उत्तर महाराष्ट्रात ना. उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी बैठक संपन्न*

63
0

 

आज नाशिक दौऱ्यादरम्यान धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांतील जिल्हा शिवसेना पदाधिकारी बैठका शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या.

बैठकांमध्ये मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या उपस्थितीत विकासाचे महत्त्वपूर्ण मुद्दे, नागरिकांच्या समस्या आणि पक्षवाढीच्या रणनीती यावर सखोल चर्चा झाली. उत्तर महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात शिवसेनेची ताकद, एकजूट आणि विकासाचा संकल्प पोहोचविण्याचा निर्धार यावेळी घेण्यात आला.

या बैठकींना मंत्री दादाजी भुसे, मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना नेते माजी खासदार राहुल शेवाळे, संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, आमदार नरेंद्र दराडे, विलास शिंदे, अजय बोरस्ते, विजय करंजकर यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here