आज नाशिक येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अंतर्गत उभारण्यात आलेल्या १ल्या ‘कौशल्य विकास केंद्रा’चे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले.
“हा महाराष्ट्राच्या औद्योगिक इतिहासातील सुवर्णक्षण आहे. महायुती सरकारच्या नेतृत्वात, तत्कालीन मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
या केंद्रातून स्थानिक तरुणांना उद्योग क्षेत्रातील आवश्यक प्रशिक्षण देऊन त्यांच्या कौशल्यात वाढ करण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षांत या केंद्रातून ८,००० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना नाशिकमध्येच रोजगार मिळवून देण्याचा संकल्प आम्ही केला आहे.
महाराष्ट्र हे देशातील उद्योजकांसाठी सर्वाधिक सुरक्षित राज्य असल्याने, सलग तीन वर्ष परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र १ नंबरवर आहे. कर्नाटक आणि गुजरातपेक्षाही महाराष्ट्र अनेक पटींनी पुढे आहे,” असे यावेळी बोलताना ना. उदयजी सामंत यांनी सांगितले.
या प्रसंगी मंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवळ, आ. दिलीप बनकर, आ. सीमा हिरे, आ. सरोज अहिरे, अशिषजी नहार, विभागीय अधिकारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.



















