Home नाशिक रक्षाबंधन निमित्त ना. कोकाटे यांनी जपला भाऊ-बहिणीच्या नात्यातील ओलावा*

रक्षाबंधन निमित्त ना. कोकाटे यांनी जपला भाऊ-बहिणीच्या नात्यातील ओलावा*

122
0

नाशिक
रक्षाबंधन निमित्ताने राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औफाक, मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी नाशिकच्या फैरोजा गफूरभाई इनामदार या बहिणीकडून राखी बांधून सण साजरा केला.
रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने या भावनिक सोहळ्याने सामाजिक सौहार्दाचा सुंदर संदेश दिला. फैरोजा आणि त्यांच्या परिवाराकडून गेली अनेक वर्षें हा जिव्हाळा नित्यनियमानुसार जपला जात असल्याचे मंत्री कोकाटे यांनी सांगितले. तसेच सणानिमित्तने भाऊ-बहिणींना पवित्र बंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मंत्री कोकाटे यांनी दिल्या.
जात-धर्माच्या पलीकडे जात, भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि जिव्हाळा जपण्याचा हा भावनिक क्षण ठरला.
दरम्यान इनामदार कुटुंबियांच्या प्रेमापोटी मंत्री कोकाटे देखील थोडे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. नेहमी आमदार म्हणून येणारे भाऊ यावर्षी मंत्री म्हणून घरी आल्याने यावेळी फैरोजा आणि त्यांचे कुटुंबियांमध्ये आनंदी वातावरण होते.

“आपल्या समाजात एकमेकांप्रती असलेली आपुलकी आणि बांधिलकी हीच खरी ताकद आहे. या पवित्र नात्यामुळे एकमेकांवरील विश्वास अधिक दृढ होतो,” असे मंत्री कोकाटे यांनी यावेळी सांगितले.

*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here