Home Uncategorized बेस्ट कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा विषय मार्गी लागणार? जोवर कर्मचाऱ्यांना प्रमोशन नाही…तोवर स्वस्थ बसणार...

बेस्ट कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा विषय मार्गी लागणार? जोवर कर्मचाऱ्यांना प्रमोशन नाही…तोवर स्वस्थ बसणार नाही … बेस्ट कामगार सेना

93
0

*मंगळवार दिनांक २२जुलै रोजी बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत , सरचिटणीस रंजन चौधरी यांच्या नेतृत्वात बेस्ट कामगार सेनेचे शिष्टमंडळ आणि आगारा-आगारातील कार्यकर्ते बेस्ट महाव्यवस्थापकांच्या भेटीला गेले.*

*सेवानिवृत्ती जवळ आलेल्या अधिका-यांना पदोन्नती देवून बक्षिसी दिली जाते , परंतु उपक्रम तोट्यात असल्याचे कारण दाखवून वाहतूक , परिवहन अभियांत्रिकी आणि विद्युत पुरवठा या विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती नाकारली जाते. हा अन्याय सहन केला जाणार नाही..अधिकाऱ्यांना देताय तर
मग कामगारांनाही द्याच….अशी आग्रही भूमिका घेतली.

त्यावर महाव्यवस्थापकांनी या विषयावर बेस्ट उपक्रमाचे कर्मचारीय विभागाचे वरिष्ठ कर्मचारीय व्यवस्थापक ( H & R ) सुशील पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यास सांगितले.
बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत साहेब यांनी कर्मचारीय विभागाच्या अधिकारी सुशील पवार, तांबे, जगताप यांच्या समवेत झालेल्या बैठकीत वाहतूक,परिवहन अभियांत्रिकी, विद्युत पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पदोन्नती विषयी चर्चा केली. त्यावर महाव्यवस्थापकांनी दिलेल्या निर्देशानुसार, कर्मचारीय विभागाने सकारात्मक चर्चा करून सर्व विभागातील विभागप्रमुखांना त्याबाबत योग्य निर्देश देण्यात येतील, ज्या ठिकाणी शक्य असेल त्याठिकाणी पदोन्नती धोरण राबविले जाईल असे सांगितले.

*विद्युत पुरवठा विभाग >*

*ग्राहकसेवा विभागातील मीटरवाचक, बिल मेसेंजर इत्यादी पदे भरण्याकरिता एक-दोन दिवसात परिपत्रक काढण्याचे कर्मचारीय विभागाने मान्य केले. येत्या काही दिवसात सदर पदे भरण्यात येतील*

*वाहतूक विभाग *

*वाहतूक विभागातील रिक्त पदे उदा. बस प्रवर्तक, लेखानिक, बस निरीक्षक पदाकरिताची पदोन्नती सुरू करण्यात येतील याबाबत संबंधित विभाग प्रमुखांकडून सूचना मागविण्यात येतील.*

*परिवहन अभियांत्रिकी विभाग*

*परिवहन अभियांत्रिकी विभागातील महाकार्यदेशक, कार्यादेशक, स.कार्यादेशक सर्व प्रकारचे टेक्निकल ट्रेडस्मन यांना वर्षांनुवर्षे ऍक्टिंग देण्यात येते त्याऐवजी त्यांना सदर पदावर कायम करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करावी अशी जोरदार मागणी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत व सरचिटणीस रंजन चौधरी यांनी केली. यास कर्मचारीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या विभागप्रमुखांसमवेत धोरण ठरवून लवकरात लवकर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले

आता माघार नाही…पाठपुरावा करणारच, जोवर कर्मचाऱ्यांना प्रमोशन नाही…तोवर स्वस्थ बसणार नाही असा निर्धार बेस्ट कामगार सेनेने बैठकी नंतर व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here