Home Uncategorized *विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री क्षेत्र चांदवड येथे रेणुका देवीचे...

*विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री क्षेत्र चांदवड येथे रेणुका देवीचे घेतले दर्शन*

75
0

*राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी केली विशेष प्रार्थना*

नाशिक, दि. २३ मे २०२५ : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ श्री क्षेत्र रेणुका देवी संस्थान, चांदवड येथे जाऊन देवीचे दर्शन घेतले. या भक्तिपूर्ण प्रसंगी त्यांच्या सोबत त्यांची भगिनी जेहलम जोशी देखील उपस्थित होत्या.

डॉ. गोऱ्हे यांनी रेणुका मातेच्या चरणी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. मंदिर परिसराची पाहणी करत त्यांनी भाविकांशी संवाद साधला. संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी दोघींचे स्वागत करत देवीच्या प्रसादाने त्यांचा सत्कार केला. डॉ. गोऱ्हे यांनीही श्रद्धेने देवीला साडी व हार अर्पण करून ओटी भरली आणि देवीच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली.

यावेळी परिसरातील नागरिक, महिला कार्यकर्त्या आणि भक्तगण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here