Home मुंबई विधान परिषदेच्या सभापतींची मोठी कारवाई

विधान परिषदेच्या सभापतींची मोठी कारवाई

169
0
मुंबई :  धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात पैशांचं भलमोठं घबाड सापडलं आहे. विश्रामगृहाच्या खोली नंबर १०२ मधून पोलिसांनी १ कोटी ८४लाख ८४ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. याच प्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटील यांचं निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या कार्यालयाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. “धुळे जिल्हा येथे विधीमंडळाची अंदाज समिती दौऱ्यावर असताना विधिमंडळाचे संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी समिती गठीत करण्यात येत आहे”, अशी माहिती राम शिंदे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.

विधान परिषदेच्या सभापतींची मोठी कारवाई

विधीमंडळाच्या अंदाज समिती दौऱ्या दरम्यान शासकीय विश्रामगृहा कोट्यावधी रुपयांची रोकड प्राप्त झाल्याप्रकरणी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. याप्रकरणी संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटील यांचे निलंबन करण्याचे आदेश सभापती राम शिंदे यांनी गुरुवारी दिले. त्यासोबतच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात येत असल्याची घोषणा राम शिंदे यांच्या कार्यालयाने गुरुवारी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here