मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आझाद मैदानावर आंदोलन करणारे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक ऊर्फ मधुभाई वयाची ९५ वर्षे पूर्ण करीत आहेत.
नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांनी लावलेल्या कोकण मराठी साहित्य परिषद नावाच्या छोट्या रोपट्याचे आज वटवृक्षामध्ये रुपांतर झाले आहे.
नवोदितांनी आदर्श ठेवावा, अशी लेखन क्षमता वयाच्या ९५ व्या वर्षी देखील असलेल्या मधु भाईंनी लिहिलेल्या पाच पुस्तकांचा प्रकाशन सोहळा या निमित्ताने *प्रभादेवी येथील रवींद्र मिनी थिएटरमध्ये शुक्रवार दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता* आयोजित करण्यात आला आहे.
सदर प्रकाशन सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे भाषा मंत्री ना. उदयजी सामंत आणि सांस्कृतिक मंत्री ना. अॅड्. आशिषजी शेलार आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
तरी आपण कृपया वृत्तांकन करण्यासाठी आपला प्रतिनिधी अवश्य पाठवावा, अशी आपल्याला विनंती करीत आहोत.
नमिता कीर, केंद्रीय अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद
प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, केंद्रीय कार्याध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद
Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग पद्मश्री मधु मंगेश कर्णिक ऊर्फ मधुभाई यांच्या ९५ व्या वाढदिवस व ५पुस्तक...



















