अभिनयाचे प्रशिक्षण नाटकातून.. *ऍक्टर व्हायचे तुला??*
*जागतिक बालरंग भूमी दिनानिमित्त छोट्या मोठ्यांसाठी नवे नाटक*
शिबिर, कार्यशाळा ,प्रशिक्षण अभ्यासक्रम यातून अभिनयाचं प्रशिक्षण दिलं जातं, पण नाटकातून अभिनयाचे प्रशिक्षण व त्याची प्रक्रिया दृश्य श्राव्य काव्य स्वरूपात देणारे रंगभूमी कलेवरचं हे पहिलंच नाटक आहे
*ऍक्टर व्हायचे तुला*20 मार्च जागतिक बालरंगभूमी दिनानिमित्त ही आगळ्यावेगळ्या संकल्पनेवरचे हे नाटक सगळ्यांच्या भेटीस आले आहे.
पालकांच्या हट्टामुळे एका छोट्या मुलाला अभिनयाच्या गुरुस्कूलमध्ये गेल्यानंतर तेथील गुरु आणि त्याचे सहकारी मित्र कशा पद्धतीने अभिनयाचं ,वागण्याचे आणि व् व्यक्तिमत्व विकसनाचे प्रशिक्षण देतात व त्यातून तो कसा उभा राहतो, या साठी रंजक पद्धतीने रंगमंचिय खेळांचा वापर करत ह्या नव्या संकल्पनेचा नाट्य अनुभव प्रेक्षकांनाआणि नवीन अभिनय शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणारा आहे
प्रा.देवदत्त पाठक लिखित, दिग्दर्शित आणि मिलिंद केळकर यांच्या प्रमुख सहाय्यक दिग्दर्शनातून
*गुरुस्कूल गुफांन*
संस्थेचा हा नवा नाट्यप्रयोग शाळा, महाविद्यालय, कला संस्था यातून होत आहे,
आजच्या काळात लोकांना ,नव्याने शिकणाऱ्याना, थोडक्यात आणि इन्स्टंट स्वरूपात काही माहिती हवी असते, त्यातूनच काही गोष्टी त्यांना समजतात, या समजण्याच्या भावनेला टोकदार करण्यासाठी हा *ऍक्टर व्हायचे तुला* नाटकाचा अनुभव उपयोगी ठरत आहे. असे विचार ज्येष्ठ रंगभूमी कला तज्ञ प्रा. देवदत्त पाठक यांनी मांडले आहेत.
गौरी पत्की, धनश्री गवस, अक्षदा वाघावसे ,मल्हार बनसोडे ,अर्णव देशपांडे, यानी अभिनय सहभाग घेतला आहे ,तर अक्षता जोगदनकर ,आर्या करपे ,अथर्व जाधव, अलोक जोगदनकर, सीमा जोगदंनकर ,उषा देशपांडे, दर्शन पोळ ऋतुजा केळकर, गौरी बनसुडे यांचे या नाट्य निर्मितीसाठी तंत्र सहाय्य लाभले आहे.
Home पुणे अभिनयाचे प्रशिक्षण नाटकातून.. *ऍक्टर व्हायचे तुला??* *जागतिक बालरंग भूमी दिनानिमित्त छोट्या मोठ्यांसाठी...




















