Home Uncategorized *उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यावरील* *आ. दरेकरांनी मांडलेला विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर*

*उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यावरील* *आ. दरेकरांनी मांडलेला विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर*

155
0

मुंबई- विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यावर ही विधान परिषद पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे, अशा आशयाचा विश्वासदर्शक प्रस्ताव भाजपा गटनेते आ.प्रविण दरेकर यांनी आज विधान परिषदेत मांडला. हा प्रस्ताव सभागृहाने आवाजी मतदानाने मंजूर केला.

आ.दरेकर यांनी “महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यावर ही विधानपरिषद पूर्ण विश्वास व्यक्त करत आहे”, असा एका ओळीचा प्रस्ताव सभागृहात मांडला. विधान परिषदेचे सभापती यांनी हा प्रस्ताव मतास टाकला व सभागृहाने आवाजी मतदानाने तो मंजूर केल्यानंतर प्रस्ताव मंजूर झाल्याचे सभापती यांनी जाहीर केले.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here