Home Uncategorized *आ. सत्यजित तांबेंकडून प्रविण दरेकरांच्या* *स्वयं पुनर्विकास योजनेचे सभागृहात कौतुक*

*आ. सत्यजित तांबेंकडून प्रविण दरेकरांच्या* *स्वयं पुनर्विकास योजनेचे सभागृहात कौतुक*

71
0

मुंबई – भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या संकल्पनेतून सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी विना विकासक ‘स्वयं पुनर्विकास’ योजना उदयास आली. मुंबईत या योजनेने गती घेतली असून सहकार क्षेत्रात ही योजना लोकप्रिय ठरली आहे. आज याचा प्रत्यय विधानपरिषदेच्या सभागृहात दिसून आले. आमदार सत्यजित तांबे यांनी या योजनेचे आणि आ. प्रविण दरेकर यांच्या कामाचे भर सभागृहात कौतुक केले.

आ. तांबे म्हणाले कि, सरकारने मोठ्या प्रमाणावर घरकुल योजना करण्याचे ठरविले आहे. आ. प्रविण दरेकर यांनी स्वयं पुनर्विकास योजना आणली त्यांचे अभिनंदन आहे. बिल्डरला बाजूला ठेवून इमारत विकसित केली तर खूप मोठा फायदा लोकांना होतो. अतिशय उत्कृष्ट अशी स्वयं पुनर्विकास योजना आहे. स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून, सहकाराच्या माध्यमातून पुनर्विकास असा प्रयोग दरेकरांनी केला आणि तो प्रचंड यशस्वी झालाय, असे उद्गार आ. तांबे यांनी काढले.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here