Home मनोरंजन *…तरीही राजा म्हणे ‘आलबेल सारे आहे’!*

*…तरीही राजा म्हणे ‘आलबेल सारे आहे’!*

204
0

माझा जन्म तिच्याचसाठी, जे करते ती आदिमाया करते! असं मानणारी मी!

भगवत गीता ,ज्ञानेश्वरी त सांगितल्याप्रमाणे, आपण तिचे अंश … जसा चंद्र आभाळी..दिसे जळी तळी सागरी!तैसे हे जीव देवाचे, शरीर वेगळले भाड्याचे!
*चौथा स्तंभ ३स्तंभांनी सोडला वाऱ्यावर, उपयोग दुरुपयोग सोईने करती!* *गरीब मालक जनता…त्रस्त आपल्याच घरी!पैसे,मतं, सत्तेची खुर्ची जनतेची!न्यायदाते आमचेच सेवक, प्रशासन पगारी आमचे! चौथ्या स्तंभात घुसलेत चाचे समंध, रक्तबीज मायावी रावण ! …मैदानात जगदंबा उतरली आहे!*

*… तिच करील निर्दालन ! मी निमित्त नाही…तिचीच दूत!*
*लढाई होणार आहे!*
*अनादी काळापासून स्त्रीची परीक्षा,..दुष्ट माजलेल्या गिधाडांना, पुरुषी क्रौर्याशी सामोरं जाऊन…त्या त्या रुपात ती भयंकर लढते!* *बिभत्स मस्तवाल हैवानांचा विनाश करते दुर्गा काली चामुंडा ..किती शस्त्र किती विक्राल तरी लोभस रुप … पण सत्तेच्या खुर्चीवर पुरुष देव ! सांबसदाशिव भोळा त्याची अर्धनारी माया जगदंबा पार्वती भवानी!*
*वासुदेव हिशेब ठेवतो पण हिशेब शेवट करण्याचे काम शंकरच करतात*
*विश्वाची ही माया काय करील गणराया?*
*पाहुणा येतो घरा जाई आईच्या घरा!*
*जगदंब जगदंब!*

*हे जनसेवकरुपी नेते मंत्री सत्य परखड ऐकून कामात सुधारणा करतील तर चित्र बदलेल!*
*बळी राजाचं राज्य येऊ दे म्हणणारेच बळीचा गळा घोटताहे!*
*पोलीस खाते,त्यात सुस्त बेरके खातेच खाते!*
*नगराचा विकास..जनतेच्या चिंध्या अपार, चोरटोळीचा डाका!*
*उद्योगाचे घरी लक्ष्मी पळापळी करी!*
*महिला बाल विकास…भारीच आडोशात!*
*युवाक्रिडाचे नाते अंधाराचे!* *वनाचे रक्षण?रोजचे अ भक्षण..*
*कृषीला नाही कसचच काई ,बळीराजा खंतावला बाई !*
*संस्कृती कशाशी खाती न कळे ज्यांसी बकबकती तेची!*
*जनतेत गटबाजी, पक्ष लढाई चँनल सोशल व्दारे घरोघरी नि हातोहाती ,पैशाची माया काय करील सांगता येत नाही!*
*जनता नावाला आहे जिवंत … पुरोगामी फुरो सुरो सनातनी मेळा जोशात आहे!*
*हाँस्पिटल्सची कुत्राआवर यंत्रणा..मुर्दाडखाना सर्वत्र सुरु आहे!…भरपेट माल आहे!*
*विरोधाची धार गंजकी अतिशहाणे-वेड्यांचा बाजार आहे लागला !..*
*तरीही राजा म्हणे आलबेल सारे आहे!*

*शीतल हरीष रामचंद्र करदेकर*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here