Home महाराष्ट्र मंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी महाविकास* *आघाडीचे आमदार आक्रमक*...

मंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी महाविकास* *आघाडीचे आमदार आक्रमक* *विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी*

138
0

*मंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी महाविकास* *आघाडीचे आमदार आक्रमक*
*विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी*

मुंबई – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयानक फोटो माध्यमांवर व्हायरल होताच आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी मंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी
आक्रमक पवित्रा घेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

महायुतीके दो गुंडे,
कोकाटे मुंडे… कोकाटे मुंडे..

दाग अच्छे है
मुंडे, कोकाटे सच्चे है..

आकाचा आका
महायुतीचा बोका
खुनी सरकार, हाय हाय अशा जोरदार घोषणाबाजी करत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारविरोधात जोरदार आंदोलन केल.

संतोष देशमुख यांचे हे व्हिडिओ आणि फोटो गेल्या दोन महिन्यांपासून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे उपलब्ध असताना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही, हा नैतिकतेचा खून आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
वाल्मीक कराड आणि इतर आरोपी विरोधात इतके पुरावे असूनही त्यांना तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, यावरून सरकारने या आरोपींना पोसले आहे असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

संतोष देशमुख यांची हत्या झाल्यावर दोन महिन्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला, हे उशिराने सुचलेले शहाणपण आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here