स्त्री आधार केंद्रातर्फे आयोजित चर्चासत्र
*जागतिक महिला आयोगाच्या ६८ व्या ऑनलाईन सत्रानिमित्त स्त्री आधार केंद्रातर्फे आयोजित चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी (ई-मेल streeaadharkendra@gmail.com) सदरील ईमेलवर नोंदणी करावी… डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आवाहन*
जागतिक महिला आयोगाच्या वतीने दरवर्षी चर्चा सत्राचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील जागतिक महिला आयोगाच्या ६८ वे चर्चा सत्र न्युयॅार्क येथे होते आहे. या चर्चा सत्रात स्त्री आधार केंद्र कोव्हिड च्या पूर्वीपर्यंत प्रत्येक्ष सहभागी होत होती. त्यानंतर मात्र हे चर्चा सत्र ऑनलाईन घेण्यात येत आहे.
स्त्री आधार केंद्राच्यावतीने दिनांक १६ मार्च २०२४ रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता *कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पर्वात स्त्री पुरूष समानतेला सायबर गुन्ह्यांचे आव्हान*
विषयावर एक परिसंवाद यावर ऑनलाइन चर्चासत्र आयोजित केले आहे. या चर्चासत्रामध्ये आपणही सहभागी होण्यासाठी ई-मेल streeaadharkendra@gmail.com ईमेल करण्याचे आवाहन संस्थेच्या मानद अध्यक्ष तथा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत विनंती ईमेल मिळाल्यानंतर झूम लिंक प्राप्त ईमेलवर पाठविण्यात येईल.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.गोऱ्हे असणार आहेत. श्रीमती चांदनी जोशी काठमांडू, नेपाळ (लिंग समभाव विश्लेषक) या महिलांची वैयक्तिक सुरक्षा व सायबर गुन्हे,
निलेश म्हात्रे (व्यवस्थापन व सायबर सुरक्षा तज्ञ) लिव्हींगस्टन न्यु जर्सी अमेरिका हे ‘महिला व सायबर गुन्हे,’
संदीप प्रकाश गादिया ( सायबर क्राईम तपास तज्ञ, मुंबई) सायबर गुन्हे अन्वेषण व सायबर गुप्त वार्ता,
बालसिंग राजपूत (सायबर क्राईम विशेष तज्ञ) मा. मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी हे ऑनलाईन आर्थिक गुन्हे ऑनलाईन लैंगिक छळ,
प्रणिती देशपांडे (हेग ,नेदरलँड) लिंग समभावा पुढील आव्हाने व सायबर गुन्हे, प्राची वॅन ब्रेण्डेनबर्ग कुलकर्णी , नेदरलॅंडस या सायबर गुन्हे प्रतिबंध, जेहलम जोशी विश्वस्त, स्त्री आधार केंद्र, मार्गदर्शन करणार आहेत.
जागतिक स्तरावर होत असलेल्या या कार्यक्रमात झूम लिंकद्वारे या बैठकीत सहभागी होता येणार आहे तसेच हा कार्यक्रम स्त्री आधार केंद्राच्या फेसबुक व यु-ट्यूबच्या संकेत स्थळावरून ही पाहता येईल.
असे आवाहन
अपर्णा पाठक, स्त्री आधार केंद्र०, २०-२४३९४१०३ / ४ ई,मेल – neeilamgorhe@gmail.com
यांनी केले आहे.




















