Home Uncategorized करुणा शर्मा व धनंजय मुंडे यांचा १८ वर्षांचा मुलगा शिशीव धनंजय मुंडे...

करुणा शर्मा व धनंजय मुंडे यांचा १८ वर्षांचा मुलगा शिशीव धनंजय मुंडे याने पोस्ट टाकून खालील प्रमाणे खुलासा केला आहे

116
0

मी शीशिव धनंजय मुंडे, मला आता बोलणे भाग आहे कारण माध्यमांनी आमच्या कुटुंबाला मनोरंजनाचा विषय बनवून टाकले आहे.

माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी तो आम्हा भावंडांना कधीही हानिकारक नव्हता. माझी आई कायम तिच्या अनेक विविध कारणांमुळे बाधित असायची आणि त्याचा वचपा ती आम्हाला वेदना देऊन काढायची.

जो घरेलू हिंसाचार तिच्यासोबत झाला असा ती दावा करते तो घरेलु हिंसाचार खरे तर मी, माझी बहीण व माझे वडील यांच्यासोबत तिच्याकडून व्हायचा.

माझ्या वडिलांना तिच्याकडून होणारा शारीरिक व मानसिक जाच असह्य झाल्यानंतर ते तिला सोडून गेल्यावर तिने मला व माझ्या बहिणीला सुद्धा घर सोडून जायला सांगितले कारण तिच्या मते तिचा व आमचा ( जन्मदाती आई असुनही) काहीही संबंध राहिला नव्हता.

2020 या वर्षापासून आमचे वडीलच आमची सर्वस्वी काळजी घेत आहेत.

माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाहीत तरीसुद्धा तिने घराचे कर्जाचे हप्ते भरायचे नाही असे जाणीवपूर्वक ठरवले आणि माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम खोट्यानाट्या गोष्टी पसरवत असते.

*शिशिव धनंजय मुंडे*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here