Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे  १० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...

कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे  १० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार ऑनलाईन उद्घाटन

191
0

कोल्हापूर/ शेखर धोंगडे

कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे  १० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार ऑनलाईन उद्घाटन

केंद्र शासनाने कोल्हापूरसह पुणे, जबलपूर, ग्वाल्हेर विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत उभारली आहे. या कामांचं उद्घाटन १० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. कोल्हापूर विमानतळाच्या विकास आणि विस्तारीकरणासाठी, खासदार धनंजय महाडिक यांनी विशेष पाठपुरावा केला आहे. त्याला यश आले आणि कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासह सुसज्ज देखणी टर्मिनल इमारत साकारली आहे. येत्या दहा तारखेला याच नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, कोल्हापूर विमानतळाच्या नव्या आधुनिक आणि सुसज्ज टर्मिनल बिल्डिंगचा उद्घाटन सोहळा होईल.  शिवाय जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित असतील. परिणामी लवकरच कोल्हापूरकरांना विमानतळावर नव्या आधुनिक आणि देखण्या इमारतीचा वापर करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here