Home मुंबई उबाठा गटाचे मुखेडचे माजी आमदार अविनाश घाटे यांनी राष्ट्रवादीत केला जाहीर प्रवेश...

उबाठा गटाचे मुखेडचे माजी आमदार अविनाश घाटे यांनी राष्ट्रवादीत केला जाहीर प्रवेश ;नांदेडमध्ये उबाठाला मोठे खिंडार

175
0

मुंबई दि. ७ जानेवारी – शिवसेना उबाठा गटाचे मुखेडचे माजी आमदार अविनाश घाटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला.

याशिवाय उबाठा गटाचे नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर, नांदेड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अ‍ॅड. संदीप पाटील चिखलीकर यांच्यासह नांदेड शिवसेना उबाठा गटातील जिल्हाप्रमुख माधव पावडे, तालुकाप्रमुख गणेश शिंदे, जिल्हा संघटक नेताजीराव भोसले, महानगरप्रमुख पप्पू जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी शिंदे, युवती सेना जिल्हाप्रमुख श्रीमती रोहिणी कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष पावडे, युवासेना शहर प्रमुख अभिजीत भालके, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश संभाजी शिंदे, दर्यापूरचे सरपंच विलास सूर्यवंशी तसेच भोकरचे दादाराव ढगे आदींनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या सर्वांना पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा देतानाच सर्वांच्या भक्कम साथीने पक्ष अधिक मजबूत होईल आणि जनसेवेत तुमचा सुद्धा मोलाचा सहभाग राहील, असा विश्वास अजितदादा पवार यांनी व्यक्त केला.

या प्रवेशावेळी आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार प्रतापराव चिखलीकर – पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here