मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयाच्या नामफलकाचे अनावरण प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
‘राष्ट्रवादी भवन’ नावाने या कार्यालयाचे अनावरण करण्यात आले. यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार इद्रीस नायकवडी, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, महिला नेत्या सुरेखाताई ठाकरे, प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे, युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे, मुंबई कार्याध्यक्षा मनिषा तुपे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्षा पुजा पवार आदींसह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी*

राष्ट्रवादी भवनमध्ये प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















